राज्याच्या राजकारणात ट्विस्ट; नागपूर जिल्ह्यातील आमदार मुंबईकडे रवाना

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

नागपूर ः राज्याच्या राजकारणात ट्विस्ट आल्याने जिल्ह्यातील सर्व आमदार मुंबईकडे रवाना झाले आहेत. भाजपचे दोन आमदार उद्या सकाळी निघणार असल्याचे कळते. 

नागपूर ः राज्याच्या राजकारणात ट्विस्ट आल्याने जिल्ह्यातील सर्व आमदार मुंबईकडे रवाना झाले आहेत. भाजपचे दोन आमदार उद्या सकाळी निघणार असल्याचे कळते. 

शनिवारी सकाळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याचे कळताच काटोलचे आमदार मुंबईकडे तातडीने रवाना झाले. आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी जाण्यापूर्वी दिली. पश्‍चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे शुक्रवारीच मुंबईला रवाना झाले होते. भाजपच्या आमदारांनी आज जल्लोष केला. त्यानंतर मोहन मते व कृष्णा खोपडे यांनी रात्रीच्या दुरांतोने मुंबईच्या दिशेने रवाना झाले. सावनेरचे आमदार सुनील केदार यांचे काही कळू शकले नाही. रामटेकचे आमदार आशीष जयस्वाल मुंबईत आधीपासूनच तळ ठोकून आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, mla, politics