Nagpur Crime : भुतबाधेच्या नावावर महिलेस आठ लाखांचा गंडा; वाघेडा येथील घटना, एक अटकेत, तिघे पसार
Superstition Case : चिमूर तालुक्यातील एका महिलेस भूतबाधेच्या नावावर एका मांत्रिकाने आठ लाख रुपयांनी गंडा घातला. याप्रकरणाची तक्रार महिलेनी केली. त्यानंतर पोलिसांनी एकास अटक केली.
चिमूर : भूतबाधेच्या नावावर एका महिलेस आठ लाखांचा गंडा घालणाऱ्या मांत्रिकास पोलिसांनी ताब्यात घेतले. परमेश्वर एकनाथ (वय ३४ रा. सेलू ता. कळमेश्वर जि. नागपूर) असे अटकेतील मांत्रिकाचे नाव आहे. याप्रकरणात तिघे फरार आहे. त्यांचा पोलिस शोध घेत आहे.