Student Suicide: अभ्यासासाठी रागावल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Student suicide

Student Suicide: अभ्यासासाठी रागावल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

नागपूर - अभ्यास आणि शाळेत जाण्यासाठी आईने रागावल्याने १५ वर्षीय विद्यार्थिनीने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना कळमना पोलिस हद्दीतील कळमना वस्ती येथे घडली.

नंदिनी महेश लांजेवार असे मृताचे नाव आहे. ती नववीत शिकत होती. तिचे आई-वडील मजुरी करतात. गेल्या काही दिवसांपासून नंदिनी अभ्यास करीत नसल्याची बाब आईला कळली.

याशिवाय ती शाळेतून कोणत्या ना कोणच्या बहाण्याने घरी लवकर येत असल्याचेही आढळले. त्यामुळे २१ फेब्रुवारीला आईने तिला रागावले.

दरम्यान तो राग मनात धरून घरी कुणीही नसताना २१ फेब्रुवारीला दुपारी १ वाजताच्या सुमारास नंदिनीने विष प्राशन केले. त्यामुळे तिची प्रकृती खालावली.

नातेवाइकांनी तिला नंदनवनमधील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान मध्यरात्री तिचा मृत्यू झाला. नंदिनीला लहान बहीण आहे. तीही तिच्यासोबत एकाच शाळेत शिकते. पोलिस उपनिरीक्षक मनोज राऊत यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.