सुधाकर मडावी यांना अमेरिकेची मानद डी.लिट पदवी

सिद्धार्थ गोसावी
शुक्रवार, 30 मार्च 2018

कोरपना (नागपूर) - राष्ट्रपती पुरस्कार विजेते सुधाकर मडावी यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन रिसर्च व डेव्हलपमेंट सेंटरने त्यांना मानद डी.लिट. पदवी मिळावी यासाठी दक्षिण अमेरिकेच्या विद्यापीठाकडे शिफारस केली होती. अमेरिकेतील विद्यापीठाने ही शिफारसमान्य करत सुधाकर मडावी यांच्या कार्याची दखल घेतली आहे. तसेच त्यांना विद्यापीठाची मानद डी.लिट. पदवी बहाल केली आहे.

आजपर्यंत सुधाकर मडावी यांना शिक्षण महर्षी पुरस्कार, समाजगौरव पुरस्कार, ज्ञानसेवा पुरस्कार, समाजसेवा पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. रक्तदान, नेत्रदान, देहदान अशा समाजकार्यातही त्यांचा सक्रीय सहभाग राहिला आहे. 

मडावी यांना डी.लिट पदवी बहाल केल्याबद्दल कोरपना तालुका पत्रकारसंघाच्या अशोककुमार भगत, के के श्रीवास्तव सिद्धार्थ गोसावी, रवी नगराले, सतिश बेतावार, प्रमोद वाघाड़े, जेनेकर, रत्नाकर चटप तसेच कोरपना पदाधिका-र्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Web Title: nagpur Sudhakar Madavi is a US Honorary D.Lit Degree