पाऊस गेला अन् उकाडा वाढला, उपराजधानीचा पारा ३५ अंशाच्या पार, विदर्भात पाऊस कधी परतणार?

When Will Rain Return to Vidarbha? : सध्या मॉन्सूनच्या पावसाची कसलीही चिन्हे दिसत नसल्याने, या आठवड्यातही उकाडा कायम राहणार आहे.
When Will Rain Return to Vidarbha?

When Will Rain Return to Vidarbha?

esakal

Updated on

नागपूर : गेल्या आठ दिवसांपासून वरुणराजा नागपूर व विदर्भातून बेपत्ता आहे. त्यामुळे कमाल तापमानात दिवसागणिक वाढ होत असून, उकाडा जाणवू लागला आहे. मंगळवारी उपराजधानीचा पारा आणखी साडेतीन अंशांनी उसळून पस्तीशीपार गेला. सध्या मॉन्सूनच्या पावसाची कसलीही चिन्हे दिसत नसल्याने, या आठवड्यातही उकाडा कायम राहणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com