
कारंजा (घा.) : तालुक्यातील मेटहिरजी येथील रहिवासी आशीष अर्जुनराव अवथळे (वय ३०) या गुराख्याचा वाघिणीच्या हल्ल्यात मृत्यू झाला. बुधवारी (ता. ११) सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण आहे.