Nagpur Traffic Signal Timing
esakal
मंगेश गोमासे
नागपूर : सिग्नलचे ‘टायमिंग’ वाहनचालकांच्या वेळेशी जुळत नसल्याने नागपूरच्या चौकाचौकात रोज ‘वेटिंग शो’ रंगतोय. हिरवा दिवा मिळण्याआधीच रांगा वाढतात; लाल दिव्यावर वेळ, इंधन आणि संयम तिन्ही खर्ची पडत आहेत. शहरात जवळपास १७१ चौकांवर सिग्नल लावण्यात आलेले आहेत. प्रत्येक चौकातील सिग्नलचा कालावधी वेगवेगळा असतो. हा टायमिंग त्या-त्या ठिकाणाच्या रहदारीवर अवलंबून असतो. त्यानुसार सिग्नलचे सिक्रोनायझेशन करण्यात येते. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये यातील बहुतांश चौकांमध्ये सिग्नलचा टायमिग बराच विसंगत असल्याचे दिसून येते.