आवाज कुणाचा... महाविकास आघाडीचा!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

डॉ. नितीन राऊत यांनी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर आनंदनगर, बिनाकी येथे जल्लोष करण्यात आला.

नागपूर : महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेसोबत उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीनंतर शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने शहरात विविध ठिकाणी गुलाल उधळून, पेढे भरवून जल्लोष करण्यात आला. 

सीताबर्डीत मिठाई वाटप 
सीताबर्डी येथील भाजीमंडी चौकात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याचा आनंद साजरा करण्यात आला. या वेळी ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष झाला. यात बाबाराब गावंडे, लालसिंग ठाकूर, सचिन मोहोड, रेखा कृपाले, प्रमिला मर्दाने, दिनेश त्रिवेदी, सुनील ढोले, कल्पना वैद्य, प्रसाद धुपे, रतन शर्मा, रूपलता वंजारी, वर्षा ढवळे, राम नायडू, रमेश दुबे, योगेश ठाकरे, बन्सीलाल यादव, विजय चिटमिटवार, विश्‍वनाथ, सचिन साहू, दिनेश सुगंध पात्रे, सुदेश सहभागी झाले होते. 

गोळीबार चौक 
महाआघाडीच्या शपथविधीनंतर गोळीबार चौक येथेही आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सेना व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उळधून आनंद साजरा केला. 

खासदार तुमाने यांच्या कार्यालयाबाहेर आनंदोत्सव 
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेल्यानंतर खासदार कृपाल तुमाने यांच्या नागपूर येथील जनसंपर्क कार्यालयाबाहेर जल्लोष साजरा करण्यात आला. या वेळी कार्यालयाबाहेर मोठी स्क्रीन लावण्यात आलेली होती. शिवसैनिक यांनी मिठाई वाटून आणि आतषबाजी करून आनंद साजरा केला. 

इतवारी मिरची बाजारात नागरिकांचे तोंड गोड 
मुख्यमंत्री तसेच मंत्र्यांचा शपथग्रहण सोहळा झाल्यानंतर कॉंग्रेस व शिवसेना कार्यकर्त्यांनी इतवारी मिरची बाजारात एकत्रित येऊन जल्लोष केला. या वेळी नागरिकांना मिठाई वाटप करण्यात आली. 

बिनाकीत गुलालाची उधळण 
डॉ. नितीन राऊत यांनी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर आनंदनगर, बिनाकी येथे जल्लोष करण्यात आला. या वेळी फटाक्‍यांच्या आतषबाजीसह गुलालाची उधळण करण्यात आली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, uddhav thakre, shivsena, congress, ncp