esakal | विद्यापीठ तयार करणार प्रश्‍नपेढी
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

विद्यापीठ तयार करणार प्रश्‍नपेढी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ पेपर सेटिंग व मॉडरेशनमध्ये होत असलेल्या चुका थांबविण्यासाठी प्रश्‍नपेढी तयार करण्यावर विचार करीत आहे. प्रश्‍नपेढीमुळे पेपर सेटिंग आणि मॉडरेशन ऑनलाइन करण्यावर भर देणार आहे.
काही वर्षांपासून परीक्षा विभागात बऱ्याच प्रमाणात बदल करण्यात आले. यामध्ये उत्तरपत्रिकांचे ऑनलाइन तपासणी, पेपर ऑनलाइन पाठविणे आणि इतर अनेक सुधारणांचा समावेश आहे. मात्र, गेल्यावर्षी पेपर सेटिंग व मॉडरेशनमध्ये बऱ्याच चुका असल्याचे निदर्शनास आले. विद्यापीठाच्या उन्हाळी आणि हिवाळी परीक्षेत प्रश्‍नपत्रिकांमध्ये दरवर्षीच किमान पाच ते सहा विषयांच्या पेपरमध्ये बऱ्याच प्रश्‍नांमध्ये चुका आणि प्रश्‍नांची पुनरावृत्ती असल्याचे आढळून येते. त्या प्रश्‍नांसाठी विद्यार्थ्यांना गुण वा पुन्हा पेपर घेण्याची नामुष्की ओढवते.
दुसरीकडे या प्रकाराने पेपरच्या तारखांचे वेळापत्रक बिघडते. या प्रकारामुळे विद्यापीठाची बदनामी होते. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी विद्यापीठाने प्रश्‍नपेढी तयार करण्याचे ठरविले. त्यासाठी चारही अधिष्ठातांचा समावेश असलेली समिती स्थापन केली. समितीची बैठकही पार पडली. बैठकीत येणाऱ्या काळात प्रश्‍नपेढी तयार करून त्यानंतर मॉडरेशन आणि पेपर सेटिंगचे काम करण्यात येणार आहे.

loading image
go to top