Nagpur Woman Pakistan Link : नागपूरची सुनीता जामगडे पाकिस्तानात गेली; संशयास्पद मोबाइल ऍप्स आणि चॅटिंगमुळे चौकशी सुरू
Sunita Jamgade Cyber Investigation : नागपूरच्या सुनिता जामगडे या पाकिस्तानमध्ये पोहोचल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या मोबाईलमध्ये संशयास्पद ॲप्स व चॅट्स आढळून आल्या आहेत.
नागपूर : शहरातून पाकिस्तानात गेलेल्या सुनीता जामगडे यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांना त्यांच्या मोबाइलमध्ये काही संशयास्पद ॲप्स सापडले आहेत. याशिवाय त्यांच्या मोबाइलमध्ये काही वेगळ्या पद्धतीची चॅटिंगही आढळून आली आहे.