नागपुरात सामान्यांची दलालांकडून लूट; १०० रुपयांचे स्टॅम्प पेपर २०० ला

नागपुरात सामान्यांची दलालांकडून लूट; १०० रुपयांचे स्टॅम्प पेपर २०० ला

नागपूर : कोरोनामुळे (Coronavirus) शासकीय कार्यालयातील कामे ठप्प झाल्यानंतर त्याचा गैरफायदा जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector office Nagpur) बसणाऱ्या दलालांनी घेतला आहे. ऐरवी १०० रुपयांत मिळणारे स्टॅम्प पेपर (Stamp paper Rate) २०० ते २५० रुपयांत विकण्यात आले. तर प्रतिज्ञापत्रासाठी (Affidavit) ४०० ते ५०० रुपये उकळण्यात येत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून जिल्हाधिकारी, तसेच दुय्यम निबंधकांच्या कार्यालयात सामान्य माणसांची सर्रास लूट होत आहे. (100 rupees stamp paper selling in 200 rupees in Nagpur)

नागपुरात सामान्यांची दलालांकडून लूट; १०० रुपयांचे स्टॅम्प पेपर २०० ला
धावत्या रेल्वेत घडला हृदय पिळवटून टाकणारा प्रसंग; प्रवाशांचेही पाणावले डोळे

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने नागपूर शहरामध्ये धुमाकूळ घातला आहे. बाधितांची संख्या साडेसात हजारांवर गेल्याने राज्य शासनाने शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची संख्या २५ ते ३० टक्‍क्यांवर आणली. लोकांच्या दैनंदिन संपर्कातील कार्यालये या दरम्यान बंद करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू प्रकल्प बंद अवस्थेतच होते. मात्र, लोकांना प्रतिज्ञापत्र, जातप्रमाणपत्र, उत्पन्नाचे दाखले यासह इतर प्रमाणपत्रांची निकड होती. त्यामुळे कार्यालय बंद असतानाही गरजेपोटी शेकडो लोक जिल्हाधिकारी कार्यालयात येत होते. मात्र इथे आल्यानंतर त्यांना काम बंद असल्याचे सांगण्यात आले.

याचा गैरफायदा परिसरात काम करणाऱ्या दलालांनी घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातील काम बंद असताना कार्यालयाबाहेर १०० पेक्षाअधिक दलाल प्रतिज्ञापत्र तसेच इतर कामे करून देण्याची हमी घेत होते. तर स्टॅम्प पेपरची विक्री बंद असताना प्रत्येक दलालांकडे १०० रुपयांचे १० ते २० स्टॅम्प पेपर प्रत्येकाकडे दिसून येत होते.

साधे प्रतिज्ञापत्र तयार करून देण्याचे स्टॅम्प पेपरसह ६०० ते ७०० रुपये घेण्यात आले. दलालांचे अधिकाऱ्यांसोबत साटेलोटे असल्याने सामान्य माणसाला परवडत नसले तरी गरजेपोटी त्यांनी ही अतिरिक्त रक्कम दिली. साधारणतः एका प्रतिज्ञापत्रासाठी १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरसह २०० रुपयांचा खर्च येतो. आता मात्र, त्याच्या तीनपट खर्च होत असल्याने कोरोनाच्या काळातील ही मोठी संघटित लूट असल्याचे बोलले जाते.

नागपुरात सामान्यांची दलालांकडून लूट; १०० रुपयांचे स्टॅम्प पेपर २०० ला
सर्वसामान्यांचे हाल-बेहाल! पेट्रोल दरवाढ आणि महागाईमुळे खिसा रिकामा

अधिकाऱ्यांचेही हात ओले

जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतूमधील अधिकारी, शहर तहसीलमधील अधिकाऱ्यांचे यामध्ये हात असल्याची चर्चा आहे. एका प्रतिज्ञापत्राच्या मागे अधिकाऱ्यांना १०० ते १५० रुपये देण्यात येत असल्याची माहिती आहे. याकरिता काही खासगी ई-सेवा केंद्रांना हाताशी धरण्यात येत आहे. त्यांच्या माध्यमातून ऑनलाइन कामे करण्यात आल्याचे समजते.

(100 rupees stamp paper selling in 200 rupees in Nagpur)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com