Nagpur News : अपघातात नागपुरात पाच महिन्यांत १२१ मृत्यू; गंभीर जखमींची संख्या मात्र वाढली
Road Safety : नागपुरात मागील पाच महिन्यांत १२१ अपघात मृत्यू नोंदवले गेले आहेत. मृत्यूसंख्या कमी झाली तरी गंभीर जखमींची संख्या वाढत आहे. वाहनसंख्येच्या वाढीमुळे शहरातील अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
नागपूर : शहरात वाहनांची संख्या सातत्याने वाढते आहे. त्यामुळे वाहतुकीशी संबंधित अडचणी वाढत असून अपघातांचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे. अपघातांत शेकडो नागरिकांना जीव गमवावा लागला आहे.