
नागपूर : केंद्र सरकारने ११ वर्षांत देशभरात विविध धर्मियांच्या धार्मिक स्थळांचा विकास केला. ही स्थळे एकमेकांशी जोडण्यात आली. त्यावर एक लाख कोटी खर्च झाले. यातून ५० लाख लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळून सुमारे २ लाख कोटींचे उत्पन्न मिळाल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.