Nagpur Cyber Crime : कधी शेअर तर कधी टास्कचे आमिष; दररोज वीस जणांची सायबर फसवणूक

Nagpur Cyber Fraud : पाच महिन्यांत सायबर गुन्हेगारांनी ७४ नागपूरकरांना तब्बल १८ कोटींनी गंडा घातल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
20 victim of cyber fraud each day nagpur crime update
20 victim of cyber fraud each day nagpur crime updateSakal

Nagpur News : अधिक नफ्याचे आमिष देऊन कधी शेअर ट्रेडिंग, टास्क तर कधी ऑनलाइन जाहिरातीच्या माध्यमातून दररोज वीस जणांची फसवणूक होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यातूनच महिन्यात सहाशेवर तक्रारींची नोंद सायबर पोलिसांकडे होत आहे. गेल्या पाच महिन्यांत सायबर गुन्हेगारांनी ७४ नागपूरकरांना तब्बल १८ कोटींनी गंडा घातल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

गेल्या काही वर्षांत सायबर गुन्हेगारीचे प्रमाण सातत्याने वाढले आहे. अनेकांना लिंक पाठवून टास्कच्या माध्यमातून नफ्याचे आमिष दाखवित गुंतवणुकीसाठी दबाव निर्माण करून फसवणूक केल्याचे दिसते. अनेकदा फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर येणाऱ्या जाहिरातीच्या माध्यमातून जास्त नफ्याचे आमिष दाखविण्यात येते.

अटक करण्याची धमकी, फेक प्रोफाईल, ऑनलाइन गेमिंग, क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातूनही लुटमारीचे प्रकार घडतात. गेल्या काही महिन्यांत ऑनलाइन ट्रेडिंग व गुंतवणुकीच्या (शेअर बाजार) बहाण्याने २७ प्रकरणांमध्ये दहा कोटी ३८ लाख ८९ हजार रुपयांनी गंडा घालण्यात आला.

टास्क देऊन ठकबाजीच्या १० घटनांची नोंद झाली असून सायबर गुन्हेगारांनी दीड कोटीने फसवणूक केली. त्याखालोखालाल ऑनलाइन फसवणुकीचे आठ गुन्हे दाखल झाले. यात ७५ लाख १९ हजार रुपयांनी गंडा घालण्यात आला.

डेबिट व क्रेडिट कार्ड बंद होण्याची भीती दाखवून ४९ हजार , बनावट प्रोफाइलच्या दोन गुन्हयात ९५ हजार रुपयांनी तर क्रिप्टो करन्सीच्या आमिषाने १७ लाख ७१ हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली.

ऑनलाइन धमकी, लैगिक छळ व समाजमाध्यमावर बदनामीचा प्रत्येकी एक गुन्हा दाखल झाला आहे. पाच महिन्यांत सायबर पोलिस ठाण्यात ७४ गुन्हे दाखल झाले. विविध आमिष दाखवून सायबर गुन्हेगारांनी १८ कोटी ६४ लाख ६० हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली.

अनेक तक्रारी पण तपास होईना

शहरात सायबरच्या दररोजच्या तक्रारीची संख्या बघता, त्या तक्रारींचा तपास करण्यात पोलिसांची संख्या कमी पडत आहे. तक्रारीची संख्या आणि मनुष्यबळ यात प्रचंड तफावत असल्याचे दिसते. अनेकदा साईड ब्रान्च म्हणून सायबर पोलिसांकडे बंदोबस्त आणि इतर जबाबदाऱ्या येत असल्याने तपासात मोठी अडचण येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com