
निर्बंधाबाबत नागपूरशी दुजाभाव करण्यात आल्याचं स्थानिकांनी म्हटलंय. कारण मुंबई आणि पुण्यात लग्नसोहळ्यासाठी २०० जणांना परवानगी आहे. मात्र, नागपुरात केवळ ५० लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सभागृह, बँक्वेट हॉलचे संचालक आणि केटरर्स चालकांचे गणित बिघडले आहे. तसेच लग्नाशी जुळलेल्या सर्व उद्योगांना वर्षभरात अंदाजे ३०० कोटींचा व्यवसाय ठप्प झाला.
लग्न सोहळ्यावर अनेक व्यावसायिक अवलंबून असतात. छोट्यापासून ते मोठे व्यावसायिकांचा व्यवसाय या सोहळ्यावर अवलंबून असतो. मात्र, जवळपास दोन वर्षापासून कोरोनाचे संकट उभे ठाकल्याने या लग्नसोहळ्याला शासनाने मर्यादा घातल्या आहेत. परिणामी या व्यवसायींकांवर उपासमारीची वेळ आली आहे. लग्न समारंभ साजरे करण्यासाठी नियमांचे पालन कठोर करून हे शुभकार्य सुरु ठेवण्याची मागणी व्यावसायिक करत आहेत. पान २ वर
लग्न सोहळा हा जीवनातील महत्त्वाचा घटक आहे. आयुष्यात लग्न एकदाच हा सोहळा होते. त्यामुळे ते धुमधडाक्यात व्हावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. दरम्यान, अलीकडच्या काळात लग्न समारोह हे लॉन्स किंवा मंगल कार्यालयात केले जातात. त्याठिकाणी सर्वसोयी एकाच ठिकाणी मिळतात तसेच कुटुंबातील व्यक्तींची धावपळ होत नाही म्हणून लॉन्स, मंगल कार्यालयाला प्राधान्य दिले जाते. लॉन्सचा मालक, वाद्य, जेवण, मिरवणुकीसाठी आवश्यक असणारा घोडा, पुजारी, केटरर्स, पाहुण्याची देखभाल करणारे, हार, पुष्पगुच्छ, छायाचित्रकार, संगीत रजनी आणि आर्केस्टा सर्व एकाच ठिकाणी मिळत असल्यामुळे सर्वात जास्त ओढा लॉन्स व मोठ्या ‘बॉंक्वेट’मध्ये वर लग्न करण्यात असते.
अनेक व्यवसायांवर संक्रात
एका लग्नावर जवळपास दहा व्यवसाय अवलंबून असतात. त्यामुळे त्यांचे कुटुंब आणि आर्थिक बजेट सर्व याच व्यवसायावर अवलंबून असते. शिवाय लॉन्सच्या मालकाला विविध प्रकारचे सरकारी कर भरावे लागतात, ग्रामपंचायत लॉन्स चालू आहे किंवा बंद हे न पाहता वार्षिक व्यावसायिक कराची आकारणी करतात. यंदा मात्र जवळपास एक वर्ष लग्न सोहळा बंद होता. याकाळात लोकांनी जमेल त्या ठिकाणी व मोजक्याच पाहुण्यांच्या हजेरीत लग्न उरकून घेतली होती.
लग्न सोहळे मोजक्या माणसात साजरे करण्याचे फर्मान काढल्यामुळे अनेक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासन आदेशानुसार सोशल अंतर आणि मास्क लावून नियमांचे पालन करत लग्नसोहळे सुरु ठेवावी, अशी मागणी व्यावसायिक करत आहेत. मंगल कार्यालयाच्या क्षमतेच्या ५० टक्के लोकांना सोहळ्यात सहभागी होण्याची परवानगी द्यावी. न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा विचार सुरु आहे.
विजय तलमले, अध्यक्ष, नागपूर मंगल कार्यालय व लॉन्स असोसिएशन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.