
नागपूर: ‘रेड्डी अण्णा ऑनलाइन’ बेटिंग ॲपद्वारे ऑनलाइन जुगारातून किराणा व्यापाऱ्याला २६ लाख रुपयांनी गंडविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी हिरेन तरुण भोजवानी (वय ३८, रा. छाप्रूनगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी बुकी, ॲप मालक, बॅंक खातेदार आणि मोबाइल धारकांविरोधात आयटी ॲक्टसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.