चंद्रपुरात म्युकोर मॉयकॉसिसचे २६ रुग्ण, कोरोनातून बरे झालेल्यांना तपासणी करण्याचे आवाहन

mucor-mycosis
mucor-mycosis File Photo

चंद्रपूर : सध्या देशात कोरोनाची दुसरी लाट (second wave of corona) प्रचंड वेगाने पसरत आहे. त्यात म्युकोर मॉयकॉसिस (mucormycosis) या बुरशीजन्य रोगाचा धोका मानगुटीवर येऊन बसला आहे. चंद्रपुरात म्युकोर मॉयकॉसिसचे तब्बल २६ रुग्ण (mucormycosis patients in chandrapur) सापडले आहेत. हा आजार कर्करोगापेक्षा दहा पट जास्त गतीने शरीरात पसरतो. यामुळे कित्येक जणांना त्यांचा जबडा, डोळे खराब होतोय आणि प्रसंगी त्यांना जीव देखील गमवावा लागत आहे. (26 patients of mucormycosis found in chandrapur)

mucor-mycosis
सहा महिन्यापासून रेशनच्या धान्यासाठी 'त्यांची' वणवण; अधिकारी देतात सतत हुलकावणी

म्युकोरमॉयकॉसिस हा आजार दुर्मिळ असला तरी नवा नाही. प्रतिकारशक्ती कमी असलेल्या, अतिदक्षता विभागात असलेल्या तसेच अवयव प्रत्यारोपण केल्या जाणाऱ्या रुग्णांना या आजाराचा धोका असतो. मात्र, कोरोनामुळे या आजाराचा धोका बळावला आहे. ही बुरशी पर्यावरणात नैसर्गिकरित्या अस्तित्वात असते. मात्र, कोरोनामध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे त्यांना संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. या बुरशीचा कण शरीरात गेल्यावर फुफ्फुसात तसेच सायनसवर त्याचा दुष्परिणाम होतो. याची लागण एकापासून दुसऱ्याला होत नाही.

म्युकोर मॉयकॉसिसची लक्षणे -

चेहऱ्यावर सूज येणे, दात दुखणे, दात हलणे, हिरडयातून पस येणे, जबडयाचे हाड उघडे पडणे, तोंडातून घाणेरडा वास येणे, नाकातून रक्त येणे, डोळ्यांवर सूज येणे, डोळ्यांची हालचाल कमी होणे, चेहऱ्यावर सूज आलेल्या जागी त्वचा काळी पडणे, नाकात अडथळे निर्माण होणे, नाकात काळे सुके क्रस्ट तयार होणे.

mucor-mycosis
नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी अन् उन्हाळी परीक्षांची तारीख ठरली, लवकरच वेळापत्रक जाहीर

उपचार काय -

तातडीने निदान करून बुरशी प्रतिकारक उपचार पद्धती अवलंब करणे आवश्यक आहे. संसर्ग शरीराच्या इतर भागात जसे जबडा, डोळे, सायनसपर्यंत पोचला, तर शस्त्रक्रिया करण्याची गरज पडते. उपचार किंवा निदान करण्यात विलंब लावल्यास दृष्टी जाऊ शकते. जबडयाचा भाग काढावा लागू शकतो. पंधरा दिवसांत हा संसर्ग ‘सर्वदूरपर्यंत पोहोचल्यास रुग्णांच्या मृत्यूची शक्यता ८० टक्के असते. त्यामुळे कोविड मधून बरे झालेल्या रुग्णांनी एकदा आरोग्य तपासणी न चुकता करून घ्यावी, असे आवाहन नोडल अधिकारी म्युकोर मॉयकॉसिस तथा दंतशल्यचिकित्स डॉ. आकाश कासटवार यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com