Solar Energy : सौरऊर्जेने उजळणार जिल्हा परिषदेच्या २७२ शाळा; वीजबिलापासून होणार सुटका

वीज बिलाच्या कटकटीपासून वाचण्यासाठी जिल्हा परिषदेच्या २७२ शाळांमध्ये सौरऊर्जा पॅनेल लावण्यात येणार आहे.
Solar Energy
Solar Energysakal
Updated on

नागपूर - वीज बिलाच्या कटकटीपासून वाचण्यासाठी जिल्हा परिषदेच्या २७२ शाळांमध्ये सौरऊर्जा पॅनेल लावण्यात येणार आहे. यासंदर्भात निविदा मंजूर करण्यात आली आहे. यापूर्वी २६९ शाळांमध्ये पॅनेल लावण्यात आले आहेत. त्यातून या शाळा सौरऊर्जेने उजळणार आहेत.

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील वीजबिल भरण्याच्या प्रश्नावरून अनेकदा तांडव झाले आहे. वेळेवर निधी मिळत नसल्याचे कारण सांगून कमी वीजबिलही भरले जात नाही. त्यामुळे अनेक जिल्हा परिषद शाळांमधील वीजपुरवठा खंडित केला जातो. याचा त्रास डिजिटल असलेल्या शाळांना होतो.

यावरून पर्याय म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सौरऊर्जा पॅनेल बसविण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत २६९ शाळांना सौरऊर्जा पॅनेल बसविण्यात आले आहेत. यावर्षी २७२ शाळांमध्ये पॅनेल लावण्यात येणार आहेत. यासंदर्भात निविदा मंजूर करण्यात आले असून एका कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे.

शाळांच्या वीज बिलांचा भरणा प्रत्येक वेळी अडचणीचा ठरत आहे. त्यामुळे प्रत्येक शाळांवरती सौर पॅनेल उभा करण्याचा निर्णय दिलासादायक आहे. सौर ऊर्जेचा वापर करून शाळांमधील संगणक, प्रोजेक्टर,फॅन आणि लाइट यांसारख्या सुविधांचा अखंड वापर होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगले शिक्षण देण्यासाठी वातावरण तयार होईल.

जिल्ह्यातील शाळांची स्थिती

  • आतापर्यंत लावलेले पॅनल - २६९

  • यावर्षी लागणारे पॅनेल - २७२

४० पेक्षा अधिक पटसंख्या असलेल्या शाळांची निवड

नागपूर जिल्हा परिषदेमधील ४० पेक्षा अधिक पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये सौरऊर्जा पॅनेल लावण्यात येत आहे. याकरिता ५४१ शाळांची निवड करण्यात आली आहे. येणाऱ्या काही दिवसांत वीजबिलाच्या कटकटीपासून या शाळा मुक्त होणार आहेत. त्याप्रमाणे पॅनेलला माकडांपासून इजा होऊन नये म्हणून त्यावर लोखंडी कठडेसुद्धा लावण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com