
नागपूर : अनेक वर्षांपासून रखडलेला मॉडेल मिल वसाहतीच्या पुनर्वसनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला. येथील ३२० कुटुंबांना आता हक्काचे घर मिळणार आहे. यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी वेळोवेळी प्रयत्न आणि पाठपुरावा केला. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हक्काचे घर मिळणार असल्याने वसाहतीतील रहिवाशांनी गडकरी यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.