Women Sarpanch : महिलांना ३८९ सरपंचपदांची लॉटरी; ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर,राजकीय रणधुमाळीला येणार वेग
Maharashtra Politics : नागपूर जिल्ह्यातील ७५५ ग्रामपंचायतींसाठी २०२५-३० कालावधीसाठी आरक्षण जाहीर झाले असून, महिलांसाठी ३८९ सरपंचपदे राखीव ठेवण्यात आली आहेत.
नागपूर : २०२५ ते २०३० वर्षासाठी जिल्ह्यातील ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. २०११ च्या जनगणनेवर आधारित लोकसंख्येनुसार अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसींचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. महिलांना ३८९ सरपंचपदांची लॉटरी लागली आहे.