नागपूर : व्याघ्र संवर्धनासाठी ५० कोटीची वाढ

अर्थसंकल्पात व्याघ्रगणनेसाठी १० कोटीचा अतिरिक्त निधी
tiger conservation
tiger conservationsakal

नागपूर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी पर्यावरण, वने आणि हवामानबदल मंत्रालयाला यंदाच्या अर्थसंकल्पात ३०३० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यात व्याघ्र संवर्धनाच्या निधीत ५० कोटीची वाढ केलेली आहे. गतवर्षी या प्रकल्पासाठी २५० कोटीच्या निधीची तरतूद होती. ती आता ३०० कोटी केली आहे. चार वर्षानंतर होणाऱ्या व्याघ्र गणना आणि वाघांच्या संवर्धनासाठी दहा कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद अर्थसंकल्पात केली आहे.

tiger conservation
राज्यात कोरोना मृतांचा आलेख वाढला; दिवसभरात १८०६७ नव्या रुग्णांची भर

भारतात वाघांची संख्या वाढत असताना देशातील ५२ व्याघ्रप्रकल्पांचे वनक्षेत्र गेल्या दहा वर्षांत २२.६२ चौरस किलोमीटरने कमी झाले आहे. यामुळे व्याघ्रसंवर्धनाचे नवे आव्हान निर्माण झाले आहे. त्यात दहा कोटीच्या निधीची तरतूद व्याघ्र संवर्धनासाठी करण्यात आलेली आहे. देशातील २० व्याघ्रप्रकल्पांचे क्षेत्रफळ १.२८ चौरस किलोमीटरवरून २३८.८० चौरस किलोमीटरपर्यंत वाढले आहे. मात्र, उर्वरित ३२ व्याघ्रप्रकल्पांचे क्षेत्रफळ ०.६ चौरस किलोमीटर ते ११८.९७ चौरस किलोमीटरपर्यंत कमी झाले आहे. मागील दहा वर्षांत सिंहांसाठी उपयुक्त वनक्षेत्रात ३३.४३ चौरस किलोमीटरने घट झाली आहे. वाघांचा भ्रमणमार्ग सुमारे १४ ते ८९.३७ चौरस किलोमीटरमध्ये पसरला आहे. तो देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ०.४३ टक्के आहे. वाघाच्या भ्रमणमार्गातील वनक्षेत्र एक हजार १७५.१२ चौरस किलोमीटरमध्ये पसरले असून, ते देशाच्या एकूण वनक्षेत्राच्या १.६२ टक्के इतके आहे.

tiger conservation
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना श्रद्धांजली

भारतातील ५२ व्याघ्रप्रकल्पांमध्ये मागील दहा वर्षांत तेलंगणामधील कावल अभयारण्यात सर्वाधिक ११८.९७ चौरस किलोमीटरची घट नोंदवण्यात आली. कर्नाटकातील भद्रामध्ये ५३.०९ चौरस किलोमीटरची घट नोंदवण्यात आली. व्याघ्र प्रकल्पातील वनक्षेत्र कमी झाल्याने अर्थसंकल्पीय तरतुदीत वाढ केल्याचे बोलले जात आहे. दहा कोटी रुपये व्याघ्र संवर्धन आणि गणनेसाठी तरतूद केलेली आहे. हा निधी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाला (एनटीसीए) देण्यात येणार आहे. देशातील हत्ती प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात वेगळी ३३ कोटीची तरतूद केली आहे. मागील वर्षी ३५ कोटीची तरतूद केली होती. त्यात यंदा दोन कोटीची कपात केली आहे. तसेच केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणासाठी गतवर्षी ११ कोटीची तरतूद केली होती त्यात यंदा एक कोटीची कपात करून दहा कोटी रुपये करण्यात आलेले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com