नागपूरकरांनो, मोठा दिलासा! बाधितांपेक्षा अडिचपटीने वाढले कोरोनामुक्त

नागपूरकरांनो, मोठा दिलासा! बाधितांपेक्षा अडिचपटीने वाढले कोरोनामुक्त

नागपूर : कोरोना विषाणूच्या (Corona Virus) दहशतीने नागपूर पुरते ढवळून निघाले आहे. या आजाराच्या विळख्या अडकणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली होती. यामुळे कोरोन मृत्यूची जणू त्सुनामी शहराने अनुभवली. मात्र दहा दिवसांपासून कोरोना विषाणूचा प्राद्रुभाव (Nagpur Corona Update) मंदावला आहे. मे महिन्याच्या १० व्या दिवशी बाधितांच्या तुलनेत अडिचपट व्यक्तींनी कोरोनावर मात केली. ते ठणठणीत बरे झाले. सोमवारी (ता.१०) २ हजार ५३० नवीन बाधितांची भर पडली. तर तब्बल ६ हजार ६८ जणांनी कोरोनाला हरवले. मात्र मागील २४ तासांमध्ये ५१ जणांचा मृत्यू झाला. मृत्यूचा दर कमी झाल्यामुळे प्रशासनाने दिलासा व्यक्त केला. (6068 corona patients defeat corona today in Nagpur)

नागपूरकरांनो, मोठा दिलासा! बाधितांपेक्षा अडिचपटीने वाढले कोरोनामुक्त
पश्चिम विदर्भाच्या विकासाची ट्रेन थांबलेलीच; वाचा सरकारी अनिर्णयक्षमतेची ‘विनोदी कथा’

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याने आरोग्य विभागाला आंशिक दिलासा मिळाला आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२० मध्ये कोरोनाचा उद्रेक झाला होता. त्यानंतर रुग्णालयांत दाखल होम्यासाठी खाटा मिळत नव्हत्या. तीच परिस्थिती मार्च आणि एप्रिल २०२१ मध्ये निर्माण झाली. केवळ दीड महिनाच कोरोनाचा प्रभाव तीव्र असल्याचे दोन्ही लाटेवरून दिसून आले. यावेळी कोरोनाचे रुप बदलल्याने संसर्गासह मृत्यूचा उद्रेक झाला.

मागील दहा दिवसांमध्ये ३९ हजार ५३१ नवीन कोरोनाबाधितांची भर पडली आहे. तर ६८ हजार ५६८ जणांनी दहा दिवसांमध्ये कोरोनावर मात केली आहे. यामुळेच कोरोनाचा रिकव्हरी रेट हा ८६.५६ टक्क्यावर पोहचला आहे. सोमवारी आढळलेल्या २ हजार ५३० बाधितांमध्ये शहरातील १ हजार ३७१ तर ग्रामीण भागातील १ हजार १४९ जण बाधित आढळून आले. तर जिल्ह्याबाहेरचे १० जण आढळले.यामुळे आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ५१ हजार ६०५ झाली आहे. आजच्या ५१ मृत्यूंमध्ये ३१ मृत्यू शहरातील आहेत. तर १० मृत्यू ग्रामीण आणि १० मृत्यू जिल्ह्याबाहेरील आहेत. यामुळे तापर्यंत जिल्ह्यात कोरोना मृत्यूंची संख्या ८ हजार १९३ झाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकत्कक यांनी प्रसारित केली आहे. चाचणी केंद्रावर गर्दी दिसेना

चाचण्यांची संख्यदेखील काही प्रमाणात कमी झाली आहे. दोन दिवसांपासून २० हजाराच्या आत चाचण्या होत आहेत. चाचणी करणाऱ्यांची संख्या केंद्रावर दिसत नाही. आज १५ हजार ३१० जणांनी चाचण्या केल्या आहेत. यातील अडिच हजार नमूने बाधित आढळले. तर ६ हजार ६८ जणांनी मात केल्याने आतापर्यंत कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या ३ लाख ९२ हजार३६९ झाली आहे. तर आतापर्यंत २४ लाख ७६ हजार ६१७ कोरोना चाचण्या झाल्या आहेत. यातील ४ लाख ५१ हजार५०५ जण बाधित आढळले.

नागपूरकरांनो, मोठा दिलासा! बाधितांपेक्षा अडिचपटीने वाढले कोरोनामुक्त
सावधान! सोशल मीडियावर लहान मुलांचे 'हे' फोटो चुकूनही करू नका शेअर; अन्यथा...

जिल्ह्यात ७ हजार २५१ बाधित रुग्णालयात

जिल्ह्यात आता ३१ हजार १४३ कोरोनाबाधित आहेत. यात शहरी भागात २६ हजार १७१तर ग्रामीण भागातील २४ हजार ९७२ कोरोनाबाधित आहेत. तर जिल्ह्यात सुमारे ४१ हजार ३६२ कोरोनाबाधित घरीच उपचार घेत आहेत.

(6068 corona patients defeat corona today in Nagpur)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com