Fake Currency Notes : रेल्वे स्थानकावर बनावट नोटांचा भंडाफोड ; ७० हजाराच्या नकली नोटा जप्त

प्लॅटफॉर्मवर खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्या वेंडरला प्रवाशाकडून मिळालेल्या ५०० रुपयाच्या नकली नोटावरून बनावट नोटा आणणारी आंतरराज्यीय टोळी लोहमार्ग पोलिसांच्या हाती लागली. टोळीकडून ७० हजार रुपयांच्या नोटा जप्त केल्या असून त्यांनी बांगलादेशमधून अशा तीन लाखांच्या बनावट नोटा आणल्या होत्या.
Fake Currency Notes
Fake Currency Notes sakal

नागपूर : प्लॅटफॉर्मवर खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्या वेंडरला प्रवाशाकडून मिळालेल्या ५०० रुपयाच्या नकली नोटावरून बनावट नोटा आणणारी आंतरराज्यीय टोळी लोहमार्ग पोलिसांच्या हाती लागली. टोळीकडून ७० हजार रुपयांच्या नोटा जप्त केल्या असून त्यांनी बांगलादेशमधून अशा तीन लाखांच्या बनावट नोटा आणल्या होत्या.

३ मे रोजी हावडा-मुंबई गीतांजली एक्स्प्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वर थांबली होती. खाद्यपदार्थ विक्रेता अनिल तिवारी (३६) रा. सुरेंद्रगड याला एका प्रवाशाने बोलाविले. ५०० रुपयांची नोट देऊन ५० रुपयांचे खाद्यपदार्थ घेतले. अनिलला ५०० रुपयांची नोट बनावट असल्याचा संशय आला.

रेल्वे स्थानकावर बनावट नोटांचा भंडाफोड

त्याने आरपीएफ जवान आशिष कुमार लक्ष्यकारच्या मदतीने त्याला पकडले. लखपर मंडल (४२) रा. पश्चिम बंगाल असे आरोपीचे नाव आहे. आरपीएफने प्रकरण लोहमार्ग पोलिसांकडे सोपवले. पोलिस निरीक्षक मनीषा काशीद यांनी केवळ एका पाचशेच्या बनावट नोटेवरून सखोल तपास केला. तांत्रिक तपासाच्या आधारे ठिकठिकाणी तपास करून सात आरोपींना पकडले.

मामून मंडल (१९) रा. ग्रामीण पश्चिम बंगाल, यमुना प्रसाद शाह (३५) रा. पुणे, इंद्रजित मंडल (३३) रा. पश्चिम बंगाल, संतोष मंडल (३६) रा. मालदा, किशोर शिंदे (३२) रा. चाकण पुणे व शशिकला ऊर्फ सानिका दौंडकर (४२) रा. पुणे अशी अटकेतील इतर सहा आरोपींची नावे आहेत. आरोपींच्या ताब्यातून ७० हजार ५०० रुपये बनावटी नोटा जप्त करण्यात आल्या. यात ५०० रुपयांच्या ७१ नोटा आहेत. या टोळीचा म्होरक्या इनामूल हक (४०) रा. मालदा, पश्चिम बंगाल हा बनावट नोटांचा व्यवसाय करतो. सध्या तो मालदाच्या कारागृहात आहे.

बांगला देशातून ३ लाख बनावट नोटा आणल्या

इनामूलने एक लाख भारतीय चलनी नोटांच्या बदल्यात बांगला देशातून तीन लाख रुपये आणले. इंद्रजितने त्याच्याकडून तीन लाख घेतले, तर लखपरने इंद्रजितकडून साडेतीन लाख बनावट नोटा घेतल्या व सर्व आरोपींनी त्या बनावट नोटा महानगरातील बाजारात पसरविल्या आहेत. ही कारवाई लोहमार्ग पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक मनिषा काशीद, सहायक पोलिस निरीक्षक नीलम डोंगरे, हवालदार संजय पटले, पुष्पराज मिश्रा, सतीश बुरडे, प्रवीण खवसे, अमोल हिंगवे, मजहर अली आदींनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com