
नागपूर : दुचाकी आणि चारचाकी वाहन चालविताना, ड्रायव्हिंग लायसन्स सोबत ठेवणे अनिवार्य असताना, वर्षभरात नागपुरातील ७३ हजारांवर नागरिकांनी परवाना नसताना वाहन चालविल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये नियम मोडणाऱ्यांची संख्या अधिक होती.