
नागपूर - विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात १६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज असून यंदा जवळपास साडेसात हजारावर पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे. यामध्ये राज्यातील इतर जिल्ह्यातील पोलिस अधिकारी आणि एसआरपीएफ कंपन्यांचाही समावेश करण्यात आलेला आहे.