दिलासादायक! नागपुरात बाधितांच्या तुलनेत दुपटीने कोरोनामुक्त

दिलासादायक! नागपुरात बाधितांच्या तुलनेत दुपटीने कोरोनामुक्त

नागपूर ः गेल्या दीड महिन्यांपासून वाढलेला कोरोनाचा ( Corona) प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाला. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आढळून आलेल्या कोरोनाबाधितांच्या तुलनेत मे महिन्यातील पहिल्या आठवड्यात बाधितांसह मृत्यूची (Corona deaths) संख्या अधिक आहे. मात्र एकूणच कोरोनाच्या बाधितांची संख्या घटली असून कोरोनावर मात करणाऱ्यांचा टक्का बराच वाढला. जिल्ह्यात शनिवारी (ता.८) कोरोनाचे ८१ मृत्यू झाले. तर बाधितांपेक्षा दुपटीने कोरोनामुक्त आढळून आले. बाधितांची संख्या ३ हजार ८२७ आहे तर ७ हजार ७९९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण कोरोनामुक्तांची संख्या ३ लाख ७९ हजार ६५७ झाली आहे. (7799 people defeat corona today in Nagpur)

दिलासादायक! नागपुरात बाधितांच्या तुलनेत दुपटीने कोरोनामुक्त
'खोडा टाकण्याची काँग्रेसची परंपराच'; महापालिकेतील सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांची टीका

कोरोनाचा आलेख बऱ्यापैकी खाली आला आहे. मागील आठ दिवसांपासून कोरोनाबाधितांपेकी कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. आठ दिवसात कोरोनाबाधितांची संख्या ३८ हजार१८४ आढळूनआली आहे. तर ५५ हजार ९५६ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. एप्रिल महिन्यात पहिल्या आठवड्यातील बाधितांच्या तुलनेत मेच्या पहिल्या आठवड्यातील कोरोनामुक्तांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

यामुळे जिल्ह्यातील नागरीकांच्या जीवाला लागलेला घोर कमी झाला आहे. २४ तासांमध्ये जिल्ह्यातून दिवसभरात तपासलेल्या २०,२३५ चाचण्या करण्यात आल्यात. त्यापैकी १८.९१ टक्के अहवाल म्हणजेच ३ हजार ८२७ जणांचे अहवाल कोरोनाबाधइत आले आहेत. यात शहरातील २ हजार ०१६, ग्रामीणचे १ हजार ७९७ तर जिल्ह्याबाहेरील १४ जणांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ४५ हजार ९७१ वर पोहचली आहे. तर सध्यस्थितीत सक्रिय रुग्णांच्या संख्येत प्रचंड गतीने घट होत आहे. आज घडिला शहरातील ३१ हजार २२८ व ग्रामीणमधिल २७ हजार ०१७ असे ५८ हजार २४५ सक्रिय कोरोनाबाधित आहेत. यातील जवळपास ८०.१६ टक्के म्हणजेच ४६ हजार ६८८ जणांना कुठलीही लक्षणे नसल्याने ते गृह विलगीकरणात आहेत. तर सौम्य, मध्यम, तीव्र व गंभीर अशी लक्षणे असलेले ७ हजार ७३० जण मेयो, मेडिकलसह इतर शासकीय व खासगी रुग्णालये तसेच कोविड केअर सेंटरमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत.

दिलासादायक! नागपुरात बाधितांच्या तुलनेत दुपटीने कोरोनामुक्त
दुर्दैवी! पूर्व विदर्भात गेल्या वर्षभरात २ हजार ४२६ चिमुकल्यांचा थांबला श्वास; २१७ माता दगावल्या

कोरोनाबळींची संख्या ८ हजारावर

जिल्ह्यात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या मात्र कमी झालेली नाही. दर दिवसाला मृतांच्या संख्येमधिल चढ-उतार कायम आहेत. शनिवारी शहरातील ५१ ग्रामीणचे १६ व जिल्ह्याबाहेरील १४ अशा ८१ जणांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबळींची संख्या ८ हजार ६९ वर पोहचली आहे. यामध्ये नागपूर शहरातील ४ हजार ८७४ तर ग्रामीण भागातील २ हजार४१ आणि जिल्ह्याबाहेरील ११५४ जणांचा समावेश आहे.

(7799 people defeat corona today in Nagpur)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com