बापरे! गाईच्या पोटातून निघाले तब्बल ८० किलो प्लास्टिक

बापरे! गाईच्या पोटातून निघाले तब्बल ८० किलो प्लास्टिक

नागपूर ः महाल बडकस चौकातील एका एका गाईच्या (Cow) पोटातून एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल ८० किलो प्लास्टिक काढण्यात आले. पशुवैद्यकीय दवाखान्यातील डॉ. मयूर काटे त्यांचे सहकारी शेखर मेश्राम आणि मुकेश चवरे यांनी सलग दोन ते तीन तास शस्त्रक्रिया करून गाईच्या पोटातील प्लास्टिक काढून गाईला जीवदान दिले आहे. (80 KG plastic found in cows stomach in Nagpur)

बापरे! गाईच्या पोटातून निघाले तब्बल ८० किलो प्लास्टिक
दहावीच्या विद्यार्थ्यांना पुन्हा अभ्यास करावा लागणार?

दुधाची पिशवी असू द्या की भाजीची पिशवी किंवा किराणा प्रत्येक वस्तू प्लास्टिकमध्ये बंद करून विकण्यात येते. काम संपले की त्या पिशव्या रस्त्यात टाकतात. काहीवेळा शिळे अन्न, लग्न समारंभात उरलेले अन्न किंवा शिल्लक भाजीपाला सर्व काही प्लास्टिकमध्ये बंद करून कचरा कुंडीमध्ये फेकण्यात येते. यामुळे गाय प्रत्येक प्लास्टीकमध्ये अन्नच असल्याचे समजून प्लास्टिकच खातात.

गाईने खाल्लेलं प्लास्टिक तिच्या पोटात विरघळत नाही किंवा ती विरघळण्याची कोणतीच प्रक्रिया तिच्या पोटात होत नाही. त्यामुळे या प्लॅस्टिकच्या पिशव्या ऑपरेशनशिवाय निघत नाहीत.

महाल बडकस चौक परिसरात गौप्रेमी व विश्व हिंदू परिषद गोरक्षण विभागाचे केंद्र मंत्री सुनील मानसिंगा हे दररोज गाईंना गोघास देतात. दरम्यान, त्यांना एक गायीचे पोट खूप मोठे झालेले दिसले. रवंथ केलेला चारा नाक व तोंडावाटे बाहेर येत आहे असे लक्षात आले.

बापरे! गाईच्या पोटातून निघाले तब्बल ८० किलो प्लास्टिक
केंद्राकडून म्युकरमायकोसिसच्या अवघ्या २०० इंजेक्शन्सचा पुरवठा

गाईला होत असलेल्या त्रासाबद्दल पशुवैद्यकांचे मत जाणून घेतले. त्यावेळी त्याने गायीच्या पोटात बऱ्याच वर्षापासून जमा होत असलेल्या प्लास्टिक पिशव्यांमुळे आहे. त्यामुळे गाईवर उपचार करून शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानुसार धंतोली येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात शस्त्रक्रिया करण्यात आली. गायीच्या पोटातून ८० किलो प्लास्टिक काढण्यात आले.

(80 KG plastic found in cows stomach in Nagpur)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com