गोंदिया : राष्ट्रीय विधिसेवा प्राधिकरण नवी दिल्ली, राज्य विधिसेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार देशभरात १३ ते १५ ऑगस्टदरम्यान साथी मोहीम राबविण्यात येणार आहे. रस्त्यांवरील निराधार बालकांनाही आता आधारकार्ड मिळणार आहे. त्यासाठी जिल्हा साथी समितीची स्थापना करण्यात आली असून, ही समिती सर्व्हे करून विविध ठिकाणी आढळून येणाऱ्या १८ वर्षांखालील निराधार बालकांना आधारकार्ड काढून देणार आहे.