कोविड हॉस्पिटलचे नाव मोठे दर्शन खोटे, तिन्ही आयसीयूतील वातानुकूलित यंत्रणा ठप्प

 gmc nagpur
gmc nagpure sakal

नागपूर : मेडिकलमध्ये (government medical college nagpur) २५ कोटी खर्चून ट्रॉमा केअर युनिट (trauma care unit) उभारण्यात आले. मात्र, कोरोनाच्या (coronavirus) आणीबाणीत ट्रॉमाला ‘कोविड हॉस्पिटल’मध्ये (covid hospital) रूपांतरित करण्यात आले. वर्षभरापासून येथे कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. परंतु, येथे सुविधा उपलब्ध करून देण्यात येत नाही. कोविड हॉस्पिटलचे नाव मोठे आणि दर्शन खोटे, असे सुरू असल्याचे समजते. कोविड हॉस्पिटलमधील तीनही अतिदक्षता विभागातील (ICU) वातानुकूलित यंत्र बंद पडले असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. येथील रुग्णांनी ही तक्रार केली आहे. (AC closed in icu of covid ward in government medical college nagpur)

 gmc nagpur
सतत मोबाईलच्या नादात न राहता चिमुकलींन जपला छंद; दगडातून साकारल्या सुंदर कलाकृती 

यापूर्वी मेडिकलच्या कोविड वॉर्डात रुग्णांना हलवताना ऑक्‍सिजनची गरज आहे. ते ऑक्‍सिजन सिलिंडर उपलब्ध नसल्याचे वास्तव पुढे आणले होते. उपचारादरम्यान अत्यावश्‍यक असलेले ‘एबीजी’ यंत्र कार्य करीत नसल्याची बाब दै. ‘सकाळ’ने उजेडात आणली होती. २७ एप्रिलपासून मध्य भारतातील हे पहिले कोविड हॉस्पिटल कोरोनाबाधितांच्या सेवेत दाखल झाले. मात्र, अद्याप येथे सोयीचा अभाव दिसून येतो.

नागपूर व विदर्भातील बातम्या वाचण्यासाठी इथं क्लिक करा

मेडिकलच्या या कोविड हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभाग, १, अतिदक्षता विभाग २ आणि अतिदक्षता विभाग ३ आहेत. येथे वातानुकूलित यंत्रणा २४ तास असणे आवश्यक आहे. मात्र, ऐन उन्हाळ्यात ही यंत्रणा ठप्प पडली आहे.

आयसीयू वॉर्डात साध्या खाटा

कोविड हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात काही ठिकाणी आयसीयू बेडऐवजी साध्या खाटा लावण्यात आल्या आहेत. यामुळे रुग्णांना एकाच भागावर राहावे लागते. यामुळे त्याना धोका होण्याची भीती आहे. येथील आयसीयू खाटा इतरत्र हलवण्यात आल्या असल्याची माहिती पुढे आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com