चुकून तिने स्कुटीचं एक्सीलेटर वाढवलं आणि क्षणार्धात झाला घात

पती धान्य घेण्यासाठी दुकानात गेले व पत्नी रेशन दुकानाबाहेर गाडीवर बसून राहिली.
चुकून तिने स्कुटीचं एक्सीलेटर वाढवलं आणि क्षणार्धात झाला घात

कामठी (जि. नागपूर) : ती पतीसह रेशन दुकानातून (Ration shop) धान्य घेण्यासाठी निघाली. पती धान्य घेण्यासाठी दुकानात गेले व पत्नी रेशन दुकानाबाहेर गाडीवर बसून राहिली. अचानक स्कुटीचे एक्सीलेटर (Scootys accelerator) वाढले आणि गाडी दुकानाबाजूला असलेल्या घराच्या भिंतीवर जोरात आदळली. क्षणातच जागीच तिचा मृत्यू झाला. रोहिणी अक्षय गेडाम (वय २२, रा. गायत्रीनगर, येरखेडा) असे या मृत विवाहित महिलेचे नाव आहे. (Accidental death of wife in the eyes of husband)

गायत्रीनगर येरखेडा येथील रहिवासी रोहिणी अक्षय गेडाम ही महिला दुपारी दोन वाजताच्या सुमारास पती अक्षयसह दुचाकीने जुनी ओली येथील एका स्वस्तः धान्य दुकानात धान्य घेण्यासाठी आली. पती अक्षय दुचाकी उभी करून पत्नी रोहिणीला बाहेर थांबवून धान्य घेण्यासाठी दुकानात गेले. अचानक तिच्या जुपिटरचे एक्सीलेटर वाढले आणि ती जागनाथ मंदिरच्या गल्लीत एका घराच्या भिंतीवर आदळली.

चुकून तिने स्कुटीचं एक्सीलेटर वाढवलं आणि क्षणार्धात झाला घात
उपचारासाठी ४०० किमीचा प्रवास अन् दोन हजारांत दोन तास ऑक्सिजन; वाचा मृत्यूचा प्रवास

त्यामुळेतिच्या डोक्याला जबर मार बसल्याने गंभीर जखमी झाली. घटना घडताच पतीसह तेथे उपस्थित असलेले नागरिक मदतीला धावून आले. तिला प्रथमोपचारासाठी मेन रोड स्थित रॉय हॉस्पिटल येथे नेण्यात आले. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याची सूचना जुनी कामठी पोलिस ठाण्यात दिली असता पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. जुनी कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दित येणाऱ्या या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

(Accidental death of wife in the eyes of husband)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com