esakal | हिंगण्यातील हत्याकांड : अडसर ठरल्याने केला खून; आरोपीची कबुली
sakal

बोलून बातमी शोधा

The accused confessed to the murder

मंगळवारी सायंकाळी धीरज याने बंटी याला भेटायला बोलाविले. बंटी सुकळी भागात आला. धीरज याने चाकूने त्याचा गळा कापला. त्यानंतर बंटीचा मृतदेह व त्याची मोपेड विहिरीत फेकली. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. हिंगणा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून धीरज याला अटक केली.

हिंगण्यातील हत्याकांड : अडसर ठरल्याने केला खून; आरोपीची कबुली

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : बहिणीसोबत असलेल्या प्रेमात भाऊ अडसर ठरत असल्यानेच बंटी शामराव चिडाम (वय २४) याचा गेम केला, असे मारेकऱ्याने पोलिसांनी सांगितले. बंटी हत्याकांड प्रकरणात हिंगणा पोलिसांनी मारेकरी धीरज झलके (वय २३) याला अटक केली आहे. पोलिसांनी गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने धीरज याची १३ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धीरज याचे बंटी याच्या चुलत बहिणीसोबत प्रेमसंबंध होते. याबाबत बंटी याला कळाले. दहा दिवसांपूर्वी बंटी याने धीरज याला मारहाण केली. त्याच्या मोबाइलमधून बळजबरीने चुलत बहिणीचा मोबाइल क्रमांक डिलिट केला. यानंतर बहिणीला भेटल्यास ठार मारेल, अशी धमकी धीरजला दिली. बंटी हा आपल्याला ठार मारेल, अशी भीती धीरज याला होता. त्यामुळे गत आठ दिवसांपासून धीरज हा बंटीचा काटा काढण्याचा कट आखत होता.

अधिक माहितीसाठी - नात्याला काळीमा फासणारी घटना, आपल्याच नातीवर अत्याचार करून आजोबाची आत्महत्या

मंगळवारी सायंकाळी धीरज याने बंटी याला भेटायला बोलाविले. बंटी सुकळी भागात आला. धीरज याने चाकूने त्याचा गळा कापला. त्यानंतर बंटीचा मृतदेह व त्याची मोपेड विहिरीत फेकली. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. हिंगणा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून धीरज याला अटक केली. या प्रकरणाचा तपास हिंगणा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सारिन दुर्गे करीत आहेत.

संपादन - नीलेश डाखोरे

loading image
go to top