Nagpur Crime News : वाळूच्या कारवाईतून कोट्यवधीचा महसूल तिजोरीत

Nagpur Revenue : मौदा महसूल विभागाचा उपक्रम; अवैध उत्खननाविरोधात आक्रमक मोहीम
वाळू माफियांच्या विरोधात मौदा महसूल विभागाने  कारवाई करीत कोट्यवधीचा महसूल शासन तिजोरीत जमा केला
वाळू माफियांच्या विरोधात मौदा महसूल विभागाने कारवाई करीत कोट्यवधीचा महसूल शासन तिजोरीत जमा केलाesakal

Nagpur News : अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीच्या बाबतीत मौदा तालुका तसाही अव्वल समजला जातो. तरीही वाळू माफियांच्या विरोधात महसूल विभागाने कसून कंबर कसली. अवैध वाळू वाहतुकीच्या गाड्यांवर कारवाई करीत यंदाच्या आर्थिक वर्षात मौदा महसूल विभागाने कोट्यवधीचा महसूल शासन तिजोरीत जमा केला.

वाळू माफियांच्या विरोधात मौदा महसूल विभागाने  कारवाई करीत कोट्यवधीचा महसूल शासन तिजोरीत जमा केला
Nagpur News : दुग्ध व्यवसायामुळे जंगलावरील अवलंिबत्व झाले कमी; ६० टक्के कुटुंबाने साधला पशुपालनातून उत्कर्ष

मौदा तालुक्यातून कन्हान आणि सूर नदी वाहत असून खनिज संपत्ती लाभली आहे. बांधकामाकरिता आवश्यक असलेल्या वाळूची उचल याच नदी पात्रातून केली जाते. अवैध वाळू उत्खननावर आळा बसविण्यासाठी शासनाने नवीन वाळू धोरण अमलात आणले असले तरी थोड्या प्रमाणात का असेना अवैधरीत्या वाळू उत्खनन आणि वाहतूक सुरूच आहे.

यातून शासनाचा महसूल बुडत आहे. तरीही महसूल विभागाला वेळोवेळी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आणि गस्तीतून मौदा महसूल विभागाने बऱ्याचशा कारवाया केल्या.

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ (७) नुसार दंडात्मक कारवाया करण्यात आल्या. १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या आर्थिक वर्षात अवैधरीत्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रक आणि ट्रॅक्टरवर कारवाईचा बडगा उचलीत एक कोटी १५ लाख १३ हजार ६२० रुपयाचा दंड वसूल केला.

मौदा महसूल विभागाने केलेल्या कारवाईतून शासनाच्या महसूल तिजोरीत आर्थिक वर्षात कोट्यवधीची भरपाई करण्यात आली. याकरिता तहसीलदार धनंजय देशमुख यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार ओमप्रकाश काळे, नवनाथ कातकडे, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांची कामगिरी मोलाची ठरली.

वाळू माफियांच्या विरोधात मौदा महसूल विभागाने  कारवाई करीत कोट्यवधीचा महसूल शासन तिजोरीत जमा केला
Nagpur News : वसतिगृहांमध्ये आता ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया

तहसीलदार देशमुख यांनी कसली कंबर

मौदा तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीचा डंका आहे. वाळूच्या बाबतीत नेहमीच या- ना त्या माध्यमातून चर्चेचा विषय असतो. तहसीलदार धनंजय देशमुख यांनी मौदा तहसीलचा कार्यभार १९ जून २०२३ रोजी स्वीकारला.

वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी त्यांनी विश्वासातील अधिकाऱ्यांना सूचना देत नियोजन करून कंबर कसली. वेळोवेळी मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी कारवाईचा सपाटा लावला आणि यातून आर्थिक वर्षात कोट्यवधीचा महसूल शासन तिजोरीत जमा झाला.

अवैध वाळू चोरीची तक्रार करा

धानला येथील समीर श्यामकुमार हारोडे यांनी हिरा वंजारी व आशीष ठाकरे रा. नवेगाव (कोराड) यांच्या विरोधात अवैध वाळू चोरीची तक्रार दिली होती. तहसीलदार धनंजय देशमुख यांनी तक्रारीची दखल घेत गैरअर्जदार यांना कार्यालयात बोलावून बाजू मांडण्यास सांगितले.

मात्र अवैध वाळू उत्खनन, साठवणूक अथवा वाहतूक आढळून आल्यास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ (७) नुसार कारवाई करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. अवैधरीत्या वाळूचे उत्खनन आणि वाहतूक सुरू असल्याचे आढळल्यास कार्यालयात तक्रार करण्याचे आवाहन तहसीलदार देशमुख यांनी केले आहे.

वाळू माफियांच्या विरोधात मौदा महसूल विभागाने  कारवाई करीत कोट्यवधीचा महसूल शासन तिजोरीत जमा केला
Nagpur Fraud Crime : गुंतवणुकदारांची कोट्यवधीची फसवणूक ; तीन संचालकांना अटक,पोलिसांकडे तक्रारी येण्याचा ओघ सुरुच

वाळूच्या कारवाईसाठी सात पथक तैनात

अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीवर नियंत्रण आणि वचक ठेवण्यासाठी महसूल विभागाने सात दिवसांसाठी सात पथक तयार केले आहेत. वेळोवेळी त्या पथकाची गस्त सुरू असते. त्याचबरोबर मिळालेल्या माहितीच्या आधारे त्या ठिकाणी जाऊन वाळू माफियावर कारवाई केल्या जात आहे. महसूल विभागाच्या ‘अलर्ट’ भूमिकेमुळे २०२३ ते २०२४ या आर्थिक वर्षात कोट्यवधीचा महसूल जमा करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com