पैसा, प्रसिद्धीसाठी वाट्टेल ते! ऑनलाइन स्पर्धेत खेळाडूने केली फसवणूक

पैसा, प्रसिद्धीसाठी वाट्टेल ते! ऑनलाइन स्पर्धेत खेळाडूने केली फसवणूक

नागपूर : नाव, पैसा व प्रसिद्धी मिळविण्यासाठी एखादा खेळाडू कोणत्या थराला जाऊ शकतो, याचे उत्तम उदाहरण नुकतेच पाहायला मिळाले. उपराजधानीतील शिवा अय्यर (Shiva Iyer) नावाच्या युवा बुद्धिबळपटूने चुकीच्या मार्गाचा अवलंब करीत ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धा (Online chess competitions and cheats) जिंकली. मात्र, शिवाचा हा गैरप्रकार उघडकीस आल्याने विजेतेपद गमवावे लागले. शिवासह अन्य एका खेळाडूवरही कारवाई करण्यात आली. (Action-against-players-who-cheat-in-online-chess-tournaments)

कोरोनामुळे मरण पावलेले माजी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू व प्रशिक्षक उमेश पाणबुडे यांच्या परिवाराच्या आर्थिक मदतीसाठी नागपूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे नुकतेच लिचेस या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जास्तीत जास्त मदत गोळा करून अडचणीत सापडलेल्या पाणबुडेंच्या कुटुंबीयांना आधार देण्याचा आयोजकांचा प्रयत्न होता. मात्र, दोन खेळाडूंच्या गैरकृत्याने या स्पर्धेला गालबोट लागले.

पैसा, प्रसिद्धीसाठी वाट्टेल ते! ऑनलाइन स्पर्धेत खेळाडूने केली फसवणूक
वाघाचा थरार! एकाला मानेला पकडून नेले ओढत, तर दुसऱ्याला झाडावरून खेचले खाली

विदर्भातील अनेक युवा बुद्धिबळपटूंचा सहभाग असलेल्या स्पर्धेत १९ वर्षीय शिवाने अपेक्षेप्रमाणे बाजी मारली. परंतु, त्याने फसवणूक केल्याचे उघडकीस आल्याने विजेतेपद काढून घेण्यात आले. याच स्पर्धेत तृतीय स्थान पटकावणाऱ्या हर्ष नाचनकरनेही असाच प्रकार केल्यामुळे त्याच्यावरही कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे बुद्धिबळाची प्रतिमा तर डागाळलीच, शिवाय खेळाडूंच्या कारकिर्दीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गतवर्षी मार्चमध्ये लॉकडाउन लागल्यापासून ऑनलाइन स्पर्धांची क्रेझ मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या निमित्ताने अनेक युवा खेळाडूंना आयते घरबसल्या व्यासपीठ मिळाले. जवळपास सव्वा वर्षाच्या काळात जिल्हा संघटनेने १६ ब्लिट्झ व ६ रॅपिड स्पर्धांचे आयोजन केले. उल्लेखनीय म्हणजे यातील बहुतांश स्पर्धा शिवानेच जिंकल्या आहेत.

पैसा, प्रसिद्धीसाठी वाट्टेल ते! ऑनलाइन स्पर्धेत खेळाडूने केली फसवणूक
यवतमाळात सैराट पार्ट २ : प्रेमीयुगलावर मुलीच्या वडिलांनी केला प्राणघातक हल्ला

शिवाबद्दल संशय व तक्रारी आल्यानंतर लिचेसने त्याच्या चालींवर लक्ष ठेवले. यात शिवा दोषी आढळून आल्यानंतर त्याची व हर्षचीही ‘आयडी’ ब्लॉक केल्याची माहिती संघटनेचे सचिव के. के. बराट यांनी दिली. या गंभीर प्रकरणानंतर शिवाने यापूर्वी जिंकलेल्या विजेतेपदांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विशेष म्हणजे बुद्धिबळपटू असलेले शिवाचे वडीलही दोनवेळा विजेते ठरले होते.

घडलेला प्रकार खूपच वाईट आहे. शिवासारख्या प्रतिभावान खेळाडूने नाव, पैसा व प्रसिद्धी मिळविण्यासाठी अशा प्रकारचे गैरकृत्य करावे ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. त्याच्या करणीमुळे बुद्धिबळाची प्रतिमा डागाळली आहे. या प्रकरणानंतर शिवावर कारवाई करण्यासंदर्भात संघटनेतर्फे लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.
- के. के. बराट, सचिव, नागपूर जिल्हा बुद्धिबळ संघटना

(Action-against-players-who-cheat-in-online-chess-tournaments)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com