.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नागपूर : मुलाच्या गाडीने केलेल्या अपघातावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना शिवसेनेकडून टार्गेट केले जात आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मात्र सावध भूमिका घेताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही घटना मला माहीत नसल्याचे सांगून यावर भाष्य करण्यास टाळले.
दुसरीकडे काँग्रेसचे शहराध्यक्ष व आमदार विकास ठाकरे यांनी संकेत बावनकुळे कार चालवत नव्हता, असा दावा केला. संकेत कार चालवत असता तर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असती. जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, असेही विकास ठाकरे म्हणाले.