
कोदामेंढी (जि.नागपूर) : राज्यात वाळूघाट लिलावावर बंदी असतानादेखील `या ना त्या’ मार्गाने शक्कल लढवित नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूचे उत्खनन सुरु आहे. जड वाहनाबरोबरच ट्रॅक्टरद्वारेदेखील वाहतूक सुरु आहे. तालुक्यात माफियांचे खूप मोठे रॅकेट असून यांच्याशी महसूल आणि पोलिस विभागाचे चांगले अर्थपूर्ण संबंध आहेत. त्यामुळेच त्यांच्यावर फारशा कारवाई होताना दिसत नाहीत. राजकीय बळाचा
वापर करीत वाळूचा गोरखधंदा सुरु आहे. गालबोट लागू नये म्हणून एखादी कारवाई पोलिस विभागाकडून केली जाते. मात्र त्यांच्या आशीर्वादाने बेधडक नदीपात्रातून वाळूचा उपसा सुरु आहे. हे मात्र विशेष.
या चोरीत राजकीय पक्षाचे पदाधिकारी सक्रिय
शेतीचा उठाव आणि शेततळे खोदकाम करण्याचे कारण पुढे करीत उपविभागीय कार्यालयातून चार ते पाच दिवसांकरिता किंवा चारपाचशे ब्रास वाळूचे खोदकाम करण्याकरिता ‘रॉयल्टी’ दिली जात आहे. मात्र वाळू माफिया सर्रासपणे नदीपात्रातून वाळूचे खोदकाम करीत आहेत. याकडे संबंधित विभागाने मुद्दामपणे डोळेझाक केली आहे. नदीपात्रात २५ ते ३० फुटाइतके खड्डे खोदून नदीपात्राचे सौंदर्य हिरावून घेतले आहे. मौदा तालुक्यातील भांडेवाडी, सिरसोली, कोदामेंढी, तांडा, मोरगांव या भागातील सुरनदीच्या पात्रातून सर्रासपणे मोठ्या प्रमाणात दिवसरात्र वाळूचे अवैधरित्या उत्खनन केले जात आहे. त्याचबरोबर ट्रकद्वारे वाहतूक सुरु आहे. याकडे महसूल आणि पोलिस विभागाने मुद्दामपणे डोळेझाक केली आहे. शेतातून वाळूचे उत्खनन या नावाखाली नदीपात्रातून वाळूचे उत्खनन केले जात आहे. यामुळे नदीपात्रालगत असलेल्या शेतीला नुकसान पोहचत आहे. शासनाचे कोट्यवधींचे नुकसान होत असून अंतर्गत रस्त्याची चाळण झाली आहे. रस्त्याच्या दुर्दशेमुळे
नागरिक मनःस्ताप व्यक्त करीत आहेत. वाळूचोरीच्या धंद्यात जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, आमदार, आजी माजी याबरोबरच सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी सक्रिय आहेत. राजकीय वाळूमाफिया पुढाऱ्यांना आश्रय देण्याचे कार्य अरोली पोलिस विभाग करीत आहे.
शेतीच्या नावावर नदीपात्रातून वाळूचा उपसा
शेतीचा उठाव आणि शेततळे खोदकाम करण्याचे कारण पुढे करीत उपविभागीय कार्यालयातून चार ते पाच दिवसांकरिता किंवा चारपाचशे ब्रास वाळूचे खोदकाम करण्याकरिता ‘रॉयल्टी’ दिली जात आहे. मात्र वाळूमाफिया सर्रासपणे नदीपात्रातून वाळूचे खोदकाम करीत आहेत. याकडे संबंधित विभागाने मुद्दामपणे डोळेझाक केली आहे. नदीपात्रात २५ ते ३० फुटाइतके खड्डे खोदून नदीपात्राचे सौन्दर्य हिरावून घेतले आहे.
उपविभागीय अधिकारप ‘नॉट रिचेबल’
याबाबत मौद्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे उपविभागीय कार्यालयातील नायब तहसीलदार नवनाथ कातकडे यांच्याशी संपर्क केला, मात्र त्यांनी कसलाही प्रतिसाद मिळाला नाही.
संपादनः विजयकुमार राऊत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.