esakal | "मोदींचे भाषण ‘बह गया, बहक गया’ अशा स्वरूपाचे"
sakal

बोलून बातमी शोधा

Actor politician Shatrughan Sinha criticized Narendra Modi and BJP in Nagpur

महिला दिनाच्या एका कार्यक्रमानिमित्त नागपुरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मोदी यांच्या भाषणात डेप्थही नव्हती. लोकांच्या जीवनाशी निगडित बाबींवर ते बोलूच शकले नाहीत.

"मोदींचे भाषण ‘बह गया, बहक गया’ अशा स्वरूपाचे"

sakal_logo
By
योगेश बरवड

नागपूर ः पश्चिम बंगालमध्ये रविवारी पंतप्रधान मोदींचे भाषण ‘बह गया’, ‘बहक गया’ अशा स्वरूपाचे होते, अशा शब्दात टीका करून सुप्रसिद्ध अभिनेते व भाजपचे माजी नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी मिथुन चक्रवर्ती यांना फक्त स्वतःच्या फायद्यासाठी भाजपने पक्षात घेतल्याचा आरोप केला.

महिला दिनाच्या एका कार्यक्रमानिमित्त नागपुरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मोदी यांच्या भाषणात डेप्थही नव्हती. लोकांच्या जीवनाशी निगडित बाबींवर ते बोलूच शकले नाहीत. जीडीपी, इंधन दरवाढ, शेतकरी आंदोलन हे ज्वलंत विषय टाळले. शेतकरी व जनतेला ‘दवा’ची नाही तर ‘दुवा’ आणि ‘मऱ्हम’ची गरज होती. 

नागरिकांनो सावधान! कोरोनासह 'या' गंभीर आजाराचा धोका; गल्लोगल्ली कचरा; सफाई कर्मचाऱ्यांचे...

पश्चिम बंगालची जनता ममतांच्या पाठीशी आहे. त्यांची प्रतिमाही चांगली आहे. कडवा विरोधच लोकांमध्ये ममतांविषयी सहानुभूती निर्माण करण्याची शक्यता आहे. पवार यांच्या मागे ईडी लावण्याचा प्रयत्न करताच महाराष्ट्रात परिस्थिती पालटली. बिहारमध्येही एकट्या तेजस्वी यादव यांचे २५ हेलिकॉप्टर पाठलाग करीत होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

उपराजधानीत हे चाललंय काय? खुर्चीला हात पाय बांधून चिरला वृद्धाचा गळा; जेष्ठांच्या सुरक्षिततेवर...

महिलेला हताश करण्याचे प्रयत्न

भाजपने फायद्यासाठी मिथुन चक्रवर्तींना सोबत घेतले आहे. त्यांच्यावर उशीर झाल्याची पाटी लावण्याची वेळ येऊ नये, एवढीच अपेक्षा असल्याचा उपरोधिक टोला त्यांनी हाणला. चक्रवर्ती आपले जवळचे मित्र आणि चांगला माणूस आहे. पण, भाजपमध्ये येताच साप, विंचू, कोब्रा यासारख्या भाषेचा वापर केला. ही भाषा योग्य नसल्याचे सिन्हा म्हणाले. ममतांकडे मोठा अनुभव आहे. मात्र, भाजपद्वारे एका महिलेला हताश करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ