
नागपूर / अमरावती : मुंबईत लोकलमधील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष सुटलेल्या १२ पैकी दोन आरोपींना नागपुरातील तर चार आरोपींना अमरावती मध्यवर्ती कारागृहातून सोमवारी पावणेआठच्या सुमारास सुटका करण्यात आली. मागील १९ वर्षापासून ते कारागृहात शिक्षा भोगत होते. कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्यांना घेण्यासाठी कुणीही आले नाही, हे विशेष.