Shravan Month 2024 : ७१ वर्षांनंतर यंदा श्रावणात पाच सोमवारचा दुर्मीळ योग

Lord Shiva Worship in Shravan month |पाच ऑगस्टपासून प्रारंभ; सोमवारी सुरू अन् सोमवारीच होणार समाप्ती
after 71 years shubh yoga shravan somvar dates puja vidhi shravan somwar vrat culture
after 71 years shubh yoga shravan somvar dates puja vidhi shravan somwar vrat cultureSakal
Updated on

नागपूर : यावर्षीचा भगवान महादेवाच्या उपासनेचा श्रावण मास येत्या पाच ऑगस्ट रोजी सुरू होत असून, तीन सप्टेंबरला या महिन्याची समाप्ती होत आहे. यंदाच्या श्रावणात पाच सोमवारचा दुर्मीळ योग तब्बल ७१ वर्षांनंतर येणार असल्याची माहिती, आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी दिली.

डॉ. वैद्य यांच्या मते, यावर्षी श्रावण मास सोमवारी सुरू होणार असून, सोमवारीच समाप्ती होत आहे. त्यामुळे यावर्षी महादेवाच्या भक्तांसाठी पाच सोमवारचा अनोखा योग जुळून आला आहे. तब्बल सात दशकानंतर हा योग आल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी १९५३ मध्ये असा योग आला होता. त्यावर्षी सोमवारी (१० ऑगस्ट) श्रावण आरंभ होऊन सोमवारीच (८ सप्टेंबर) श्रावणाची समाप्ती झाली होती.

उल्लेखनीय म्हणजे, २००६ मध्येदेखील पाच श्रावण सोमवार आले होते. तर २०२३ मध्ये अधिक मासामुळे श्रावण दोन महिने चालला होता. त्यामुळे अनेकांनी त्यावेळी आठ श्रावण सोमवार केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

after 71 years shubh yoga shravan somvar dates puja vidhi shravan somwar vrat culture
Shravan 2024: बेलपत्रच नाही तर या झाडांनीही प्रसन्न होतात भगवान शंकर, अंगणात नक्की लावा

सनातन धर्मात श्रावण महिना हा शिवभक्तीसाठी विशेष मानला जातो. श्रावण महिन्यात भगवान शंकराची आराधना केली जाते. हिंदी पंचांगानुसार २२ जुलैपासून श्रावण मास सुरू झाला आहे. शहरातील शिवमंदिरांमध्ये भाविकांची संख्या वाढली आहे.

श्रावण मासात कशी करतात पूजा ?

या काळात सोमवारी सकाळी आंघोळ वगैरे झाल्यावर स्वच्छ कपडे घालावेत. पूजा गृहात किंवा शिवमंदिरात जाऊन सर्व प्रथम भगवान शंकराला पाण्याने अभिषेक करावा. त्यानंतर चंदन, अक्षता, बेलपत्रासह सर्व पूजेचे साहित्य एक एक करून अर्पण करावे. त्या दरम्यान शिव मंत्राचा जप करावा. सर्व वस्तू अर्पण केल्यानंतर शिवलिंगाची अर्धी परिक्रमा करावी.

नंतर भगवान शंकराला नमस्कार करून बसावे. त्यानंतर शिव चालिसाचे पठण करावे. मग सोमवारची व्रत कथा वाचावी. शेवटी तुपाचा दिवा लावावा किंवा कापूर जाळून भगवान शंकराची आरती करावी. शेवटी पूजेदरम्यान झालेल्या चुकांसाठी क्षमा मागावी. त्यानंतर मनोकामना पूर्ण करण्याची विनंती भगवान शंकराला करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com