

नागपूर : वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बिडगाव चौकात टिप्परने सायकलवरून जाणाऱ्या बहीण भावास चिरडले. ही घटना सकाळी ९.५० वाजता घडली. यानंतर परिसरातील नागरिकांनी टिप्पर जाळत चालकाला बेदम मारहाण केली. यावेळी पोलिस वाहन आणि अग्निशमन वाहनांची तोड फोड केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सुमित कन्हैय्यालाल सैनी (वय १५,रा.अंबेनगर, पारडी) आणि अंजली सैनी (वय१८)अशी मृतक मुलांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही चौकातुन सायकलवर जात असताना मागून भांडेवाडी येथून येणाऱ्या टिप्परने त्यांना धडक दिली. त्यामुळे दोघेही जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला
.
या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी वाहनांची तोडफोड सुरू केली. काही नागरिकांनी चालकास ओढून मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी संतप्त नागरिकांनी टिप्परची जाळपोळ केली. ही माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत जमावाला पांगविण्यास सुरुवात केली. मात्र, संतप्त नागरिकांनी पोलिस वाहनावर दगडफेक केली. अग्निशमन दलाच्या वाहनाची तोडफोड केली.
त्यामुळे पारडी, कळमना, शांतीनगर, तहसील, गणेशपेठ यासह सर्वच ठान्यातील पोलिसांना पाचारण करण्यात आले. याशिवाय अतिरिक्त पोलिस आयुक्त शेवाळे, गुन्हेशाखा उपायुक्त मुंमक्का सुदर्शन, सर्व परिमंडळ चे पोलिस उपायुक्त आणि सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी नागरिकांना पांगविण्यासाठी सौम्य लाठीमार करण्यात आला. त्यानंतर मृतदेहाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्तरीय उत्तरीय चाचणीसाठी नेण्यात आले दरम्यान परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी जमली होती बराच काळ या परिसरात तणाव असल्याने पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता याशिवाय मृदेच्या अंत्यविधीसाठी मृतकाच्या घरी बंदोबस्त लावण्यात आला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.