
नागपूर : नागपूरकर मॉन्सूनच्या प्रतीक्षेत असताना आज अचानक तापमानाने उसळी घेतली. शुक्रवारी नागपूरच्या कमाल तापमानात तीन अंशांची वाढ होऊन पारा ४१.८ अंशांवर गेला. उल्लेखनीय म्हणजे, तब्बल दोन आठवड्यानंतर नागपूरचे तापमान ४१ पार गेले आहे. ब्रह्मपुरी येथे विदर्भासह संपूर्ण राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली.