
नागपूर : शिक्षणाला वय नसतं, मात्र ते शिकण्यासाठी मनात जिद्द असावी लागते. प्रपचामुळे मध्येच शिक्षण सुटलं खर पण शिकण्याच्या जिद्दीने शहनाज वयाच्या ३६ व्या वर्षी बारावीत शिवाजी नाईट उच्च माध्यमिक शाळेत प्रवेश घेऊन बारावीत ७९.८३ टक्के गुण मिळवून राज्यातील रात्रशाळेतून प्रथम येण्याचा मान पटकाविला.