farmer
farmeresakal

Agriculture: अनुसूचित प्रवर्गातील शेतकऱ्यांनी शासनाची विशेष योजना, कृषी विभागाकडून मिळणार या सुविधा

या योजनेमध्ये अनुसूचित जाती आणि जमाती या प्रवर्गामधील शेतकऱ्यांचा सहभाग कमी असल्याने सदर प्रवर्गातील शेतकरी वर्गाने या योजनेचा लाभ घ्यावा, यासाठी कृषी विभाग प्रयत्न करत आहेत.

Schemes for Schedule Caste Farmers: शासनाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास विशेष कार्यक्रम मोहीम अभियानाच्या फलोत्पादन विकास करण्याच्या दृष्टीने विविध प्रकारच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत अनुदानावर पोहोचविन्याचे उद्दिष्ट शासनाचे आहे. या करिता उपरोक्त प्रवर्गातील शेतकऱ्यांनी अर्ज सादर करून लाभ घेण्याचे आवाहन कारंजा तालुका कृषी अधिकारी रवींद्र जटाळे यांनी केले आहे.


या योजनेमध्ये अनुसूचित जाती आणि जमाती या प्रवर्गामधील शेतकऱ्यांचा सहभाग कमी असल्याने सदर प्रवर्गातील शेतकरी वर्गाने या योजनेचा लाभ घेण्यासाठी कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन करून विविध योजनेसाठी मागणी अर्ज सादर केल्यास अशा मागणी केलेल्या अर्जावर तत्काळ कार्यवाही होऊन संबंधितांना त्याचा लाभ मिळेल.

त्यामध्ये मसाला पिके, सुटी फुले, ड्रॅगन फ्रूट लागवड, अळंबी उत्पादन प्रकल्प, सामूहिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, शेडनेट हाऊस, प्लास्टिक मल्चिंग, मधुमक्षिका पालन, पावर टिलर, ट्रॅक्टर, जमीन मशागत उपकरणे, पीक संरक्षण उपकरणे, कांदा चाळ, प्राथमिक प्रक्रिया केंद्र उभारणी, रेफर बॅन, जुन्या फळबागांचे पुनर्जीवन इत्यादी साठी लाभ मिळू शकतो.

इच्छुक शेतकरी बंधूनी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन कारंजा तालुका कृषी अधिकारी रवींद्र जटाळे यांनी केले आहे. (Latest Marathi News)

farmer
Israel Hamas War: इस्राईली सैनिकांच्या हातून मोठी चूक, आपल्याच नागरिकांवर झाडल्या गोळ्या; असं नेमकं काय घडलं?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com