ai hit book publication houses
ai hit book publication housesSakal

Nagpur News : ‘एआय’चा फटका बसतोय प्रकाशन व्यवसायाला

पुस्तकांच्या निर्मितीला सुरवात; हजारोंचा रोजगार धोक्यात

Nagpur News : आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे (एआय) नागरिकांचा रोजगार जाण्याची भीती व्यक्‍त केली जात होती. ती आता खरी ठरण्याचेच संकेत मिळत आहेत. पुस्तकांची कामे आता ‘एआय’द्वारे केली जात आहेत.

त्यामुळे, प्रकाशकांना कमी वेळेत आणि ते देखील कमी पैशांत देखण्या पुस्तकासह तगडा मजकूर मिळत असल्याने ‘एआय’ला पसंती दिली जात असली तरी या व्यवसायाशी संबंधित अनेकांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे.

मुखपृष्ठ साकारणारे कलाकार, डीटीपी ऑपरेटर या सारख्या पुस्तक निर्मितीमध्ये सहभाग असलेल्या कर्मचाऱ्यांवर रोजगार गमविण्याची वेळ येण्याची शक्यता वाढली आहे. परंतु, ‘एआय’मध्ये भावना येणार नाहीत. त्यामुळे वाचक त्याला कंटाळतील आणि पुन्हा मूळ पुस्तकांकडे येतील, अशी आशाही व्यक्‍त केली जात आहे.

‘एआय’मुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. त्याचा लाभ सर्वांना घेता येत आहे. ‘एआय’ आल्यानंतर रोजगारावर गंडांतर येणार असल्याची मोठी चर्चा होती. प्रकाशन व्यवसायामध्ये याचा शिरकाव झाल्याने ती शक्यता आता आता हळूहळू खरी होत आहे.

वेळ अन्‌ पैशाची बचत

पुस्तकाचे मुखपृष्ठ तयार करण्यासाठी त्या पुस्तकाची संकल्पना त्या कलावंताला सांगावी लागते. त्यानंतर, त्यांना जसा वेळ मिळेल, तसे ते करून देतात. तसेच, एका मृखपृष्ठाला तीन ते पाच हजारांपेक्षा अधिक पैसे आकारले जातात. हीच बाब लेखनाच्या बाबतीतही लागू होईल. पण, ‘एआय’द्वारे काही मिनिटांत चित्र व शब्दांचा साठा उपलब्ध होईल.

शालेय पुस्तकांचे प्रमाण जास्त

नागपूरमध्ये पुस्तकांची निर्मिती करणारे प्रकाशक बोटावर मोजण्या इतके आहे. परंतु, हा व्यवसाय शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर होतो, हे देखील तितकेच खरे. इतर पुस्तकांच्या तुलनेत शालेय, महाविद्यालयीन पुस्तके, नोट्सची निर्मिती शहरात मोठ्या प्रमाणात होते.

येणाऱ्या काळात ‘एआय’चा मोठा फटका या व्यावसायिकांना बसण्याची शक्यता आहे. या एकंदर व्यवसायावर कागदाचे कारखाने, छपाई, बाईंडिंग, कलाकार, डीटीपी ऑपरेटर अशा अनेकांचा रोजगार अवलंबून आहे.

पहिले पुस्तक

‘1 द रोड’ ही ‘एआय’द्वारे बनलेली जगातील पहिली प्रायोगिक कादंबरी आहे. जॅक केरोआकच्या ‘ऑन द रोड’चे अनुकरण करत रॉस गुडविनने मार्च २०१७ मध्ये या कादंबरीची निर्मिती केली.

जानेवारी २०२३ मध्ये ‘ब्रिजिंग द एआय गॅप’ हे एआय अल्गोरिदमने लिहिलेले देशातील पहिले पुस्तक मानले जाते. मुंबईस्थित फ्लुइड एआय कंपनीने पुस्तक लिहिण्यासाठी अल्गोरिदमचे प्रशिक्षण दिले.

मराठीमध्ये वल्लरी प्रकाशनने ‘पावसाचे गाणे’ बाल कविता संग्रहाचे मुखपृष्ठ व मलपृष्ठ ‘एआय’चा आधार घेऊन तयार केले.

‘एआय’वर आधारित पुस्तकांची, पुस्तकांच्या मृखपृष्ठांची निर्मिती होत आहे, ही बाब खरी आहे. पण त्याचे थेट परिणाम प्रकाशन व्यवसायावर कसे होत आहेत, हे अद्याप सांगणे कठीण आहे. त्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागेल. परंतु, ‘एआय’ निर्मित पुस्तकाला मानवी स्पर्श नाही. त्यामुळे, ती मनाला भावणारी नाहीत. कदाचित आत्ता वाचक त्या पुस्तकांकडे आकर्षित होतील. भविष्यात जुन्या कडेच वळतील, हे देखील खरे.

-सचिन उपाध्याय, कार्यकारिणी सदस्य, मराठी प्रकाशक परिषद.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com