Air Fest 2026,:वायुसेनेच्या सामर्थ्याने गरजले अवकाश ;एअर फेस्ट’ला गर्दी, सहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

Air Fest 2026 Nagpur: नागपूरच्या वायुसेनानगरमध्ये भारतीय वायुसेनेच्या एअर फेस्टचा दिमाखदार समारोप झाला. सुखोई, सूर्यकिरण, सारंग पथकांच्या हवाई कवायतींसह १६ हजारांहून अधिक नागरिकांनी प्रात्यक्षिकांचा थरार अनुभवला.
Sukhoi-30 MKI fighter jets perform an aerial display during the Indian Air Force's Air Fest 2026 in Nagpur.

Sukhoi-30 MKI fighter jets perform an aerial display during the Indian Air Force's Air Fest 2026 in Nagpur.

esakal

Updated on: 

नागपूर, : आकाशात झेपावणारी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टरच्या चित्तथरारक कवायती आणि त्यांना टाळ्यांच्या गजरात मिळणारी दाद, अशा उत्साहपूर्ण वातावरणात वायुसेनानगर येथील भारतीय वायुसेनेच्या देखभाल कमांड मुख्यालयाच्या परिसरात ‘एअर फेस्ट २०२६’चा दिमाखदार समारोप झाला.

भारतीय वायुसेनेचे शौर्य आणि हवाई कौशल्य अनुभवण्यासाठी नागपूरकरांनी सकाळी ८ वाजतापासूनच मुख्यालयाच्या प्रवेशद्वारांवर मोठी गर्दी केली होती.

Loading content, please wait...