air india express
sakal
नागपूर - एअर इंडिया एक्सप्रेसने आजपासून नागपूर आणि बंगळुरू दरम्यान दिवसातून दोन वेळा उड्डाणे सुरू केली आहे. पहिले उड्डाण नागपूरहून सकाळी १० वाजता निघाले आणि बंगळुरूला १२.०५ वाजता पोहोचले, तर बंगळुरूहून नागपूरकडे पहिले उड्डाण सकाळी ७.२५ वाजता रवाना होऊन ९.३० वाजता नागपूर विमानतळावर उतरले.