Air Travels : सहा महिन्यांत पंधरा लाखांवर प्रवाशांचा विमानप्रवास; प्रवाशांच्या संख्येत ४१ टक्के वाढ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवाशांच्या संख्येत सतत वाढ होताना दिसून येते.
Plane
PlaneEsakal

नागपूर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवाशांच्या संख्येत सतत वाढ होताना दिसून येते. कोरोनाच्या काळात दरमहा ३० ते ४० हजारांपर्यंत आलेली प्रवाशांची संख्या आता अडीच लाखांपर्यंत पोहोचली आहे. २०२३ च्या पहिल्या सहामाहीत (जानेवारी ते जून) कालावधीत १५ लाख २५ हजार ५२८ प्रवाशांनी या विमानतळावरून प्रवास केला. गतवर्षीच्या तुलनेत ही वाढ तब्बल ४१ टक्के अधिक आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून उपलब्ध आकडेवारीतून ही बाब निदर्शनास आली.

२०२२ यावर्षी (जानेवारी ते जून) या सहा महिन्यांत १० लाख ८० हजार ३८४ प्रवाशांनी येथून प्रवास केला. त्या तुलनेत यंदा ४,४५,१४४ अधिक हवाई प्रवाशांनी प्रवास केला. नागपूर विमानतळावरून प्रवास करणाऱ्या विमान प्रवाशांची संख्या २०२२ च्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेत यंदा ४१ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. आकडेवारीवरून असे दिसून आले की, देशांतर्गत आणि परदेशात प्रवास करणाऱ्या हवाई प्रवाशांमध्ये वाढ झाली.

Plane
Pune News : सशस्त्र दलातील मानाचा पुरस्कार ‘एएफएमसी’ला

२०२२ मध्ये परदेशी प्रवाशांची संख्या १९,२५० होती. तर २०२३ मध्ये हीच आकडेवारी ४५,२६७ वर गेली. देशांतर्गत हवाई प्रवाशांची संख्यादेखील २०२२ मध्ये १०,६१,१३४ वरून २०२३ मध्ये १४,८०,२६१ वर गेली. हवाई प्रवाशांच्या संख्येत वाढ सुधारित आर्थिक परिस्थितीचे दिशादर्शक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

देशात आणि जगाच्या विविध घटना आणि कार्यक्रमांची रेलचेल आहे. याशिवाय शहरातील नागरिकही देशांतर्गत आणि विदेशातील पर्यटन स्थळांना भेटी देत आहे. यामुळे शहराच्या विमानतळावरून विमान प्रवाशांची संख्या वाढली. चालू कॅलेंडर वर्षाच्या उत्तरार्धात सकारात्मक वाढ होण्याचे संकेतही व्यक्त केले जात आहेत. कारण डिसेंबर महिन्यात हिवाळी अधिवेशनासह इतरही कार्यक्रम आहेत. ताडोबा-अंधारी, पेंच आणि मध्यप्रदेशातील निसर्ग पर्यटनस्थळी जाण्यासाठी पर्यटक नागपूर विमानतळाला पसंती देतात.

त्यामुळे येत्या दोन-तीन महिन्यांत नागपूर विमानतळावरून प्रवास करणाऱ्या विमान प्रवाशांच्या संख्येत २०-२५ टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे. २०२० मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेला कोरोनासारख्या महामारीने वेढले होते. त्यावेळी विमान वाहतूक उद्योगाला फटका बसला होता. टाळेबंदीमुळे प्रवासावर निर्बंध होते. सर्वच नागरिक घरात होते. २५ मार्च ते २५ मे या कालावधीत उड्डाणे तात्पुरती स्थगित केली होती. तथापि निर्बंध काढण्यास सुरुवात झाल्यापासून विमान वाहतूक उद्योगातही हळूहळू सुधारणा होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com