
नागपूर : तब्बल अकरा वर्षानंतर व वाघांच्या शिकारीसाठी कुख्यात असलेल्या बहेलिया टोळीचा म्होरक्या अजित राजगोंड याला झालेल्या अटकेमुळे देशात खळबळ उडाली आहे. दिल्ली येथील ‘वाईल्ड लाइफ क्राईम कंट्रोल ब्युरो’ने देशातील सर्व व्याघ्र प्रकल्प आणि वाघ असलेल्या क्षेत्रांना रेड अलर्ट दिला आहे. विशेष म्हणजे अजितसोबत पाच महिलांना अटक केली आहे. यावरून शिकारीत महिलांचा सहभाग असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले होते.