Akola: कबुतर पकडण्यातून झालेल्या वादात ७ वर्षीय चुलत भावाची हत्या अन् विहिरीत फेकला मृतदेह, असा उघडकीस आला प्रकार

कबुतर पकडण्यासाठी शेतात गेला असता तेथे झालेल्या वादानंतर सात वर्षीय मुलाचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह शेतातील विहिरीत टाकून दिला. १६ दिवसांनी मृतदेह विहिरीत आढळून आला.
Akola: कबुतर पकडण्यातून झालेल्या वादात ७ वर्षीय चुलत भावाची हत्या अन् विहिरीत फेकला मृतदेह, असा उघडकीस आला प्रकार
Updated on

Akola Murder: कबुतर पकडण्यासाठी शेतात गेला असता तेथे झालेल्या वादानंतर सात वर्षीय मुलाचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह शेतातील विहिरीत टाकून दिला. १६ दिवसांनी मृतदेह विहिरीत आढळून आला. मुलाचा खून गळा आवळून झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मारेकऱ्याला शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे होते. अखेर हा खून मृतकाच्या विधिसंघर्ष १७ वर्षीय चुलत भावानेच केला असल्याचे गुढ उकलण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले.

पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेने पहिलीच उत्कृष्ट कारवाई करीत सात वर्षाच्या मुलाचा हत्येच्या क्लिष्ट गुन्ह्याची उकल केली. ता. १९ डिसेंबर २०२३ पासून हरवलेला मुलगा शेख अफ्फान शेख अय्युब (रा. बागवानपुरा पिंजर) याचा मृतदेह स्थानिक गुन्हे शाखा अकोला, श्वान पथक व पिंजर येथील पोलिस तसेच संत गाडगेबाबा आपातकालीन पथक पिंजर यांचे १२ दिवसांचे अथक प्रयत्नाने पिंजर-अकोला रोडवरील विहिरीत सापडला होता.

पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, अप्पर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलिस अधिकारी मूर्तिजापूर मनोहर दाभाडे, स्थानिक गुन्हे शाखा अकोला प्रमुख पोलिस निरीक्षक शंकर शेळके, पो.उप. नि. गोपाल जाधव व पोलिस स्टेशन पिंजरचे ठाणेदार स. पो. नि. राहुल वाघ यांनी घटनास्थळी भेट दिली.

त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विचारपूस करीत, तांत्रिक माहिती व पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनावरून गुन्ह्यातील संशयित यांना ताब्यात घेतले. सखोल विचारपूस केली असता मयत शेख अफ्फान शेख अय्युब याचा खून त्याचा चुलत भाऊ विधी संघर्षित बालक वय १७ वर्षे याने केल्याची कबुली दिली. (Latest Marathi News)

Akola: कबुतर पकडण्यातून झालेल्या वादात ७ वर्षीय चुलत भावाची हत्या अन् विहिरीत फेकला मृतदेह, असा उघडकीस आला प्रकार
Who Is Sharad Mohol: बेछुट गोळीबारात गंभीर जखमी झालेला गुंड शरद मोहोळचा उपचारांदरम्यान मृत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com