Akola अकोला : टरबूज शेतीतून नऊ लाखांचे उत्पन्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

watermelon farming

अकोला : टरबूज शेतीतून नऊ लाखांचे उत्पन्न

तेल्हारा : शेती म्हणजे एकप्रकारे जुगार खेळण्यासारखेच आहे. यामध्ये उत्पन्न कम आणि खर्चच जास्त असल्याने शेतकऱ्यांच्या डोक्यावर नेहमी कर्जाचा डोंगर असल्याचे पाहवयास मिळते. नापिकी, पीक कर्ज यामुळे अनेक शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलून आपली जीवन यात्रा संपवतात. परंतु, या सर्व गोष्टींना फाटा देऊन आधुनिक तंत्रज्ञाचा वापर करून सव्वा दोन एकर शेतीत तब्बल नऊ लाख रुपयांचे टरबूजाचे उत्पन्न घेऊन हिवरखेडच्या नितीनने युवा शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श निर्माण केला.

निसर्गाचा लहरीपणा व त्यामुळे होणारी नापिकी या विपरित परिस्थितीने खचून न जाता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यावर मात करत तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथील नितीन वानखडे या शेतकऱ्याने आपल्या सव्वादोन एकरात टरबूज फळपिकाची लागवड करून तब्बल नऊ लाख रुपयांचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. नितीनकडे असलेल्या शेतीचा पोत दर्जेदार तर आहेच, शिवाय शेतात कूपनलिका असल्याने त्याला मुबलक पाण्याची जोड आहे.

दर्जेदार शेती व मुबलक पाण्याचा पुरेपूर उपयोग घेत ते आपल्या शेतीत पिके काढताना पारंपारिक पिकांच्या मागे न लागता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून फळपिके घेतात. त्यांनी आपल्या शेतात केळीचे पीक काढल्यानंतर शेतीची मशागत केली व संकरित बियाण्याचा वापर करून टरबूज लागवाड केली. पिकाला आवश्यक प्रमाणात पाणी देण्याकरिता ठिंबक सिंचनाचा उपयोग केला व जमिनीतील ओलावा कायम राहावा याकरिता मल्चिंग आथरले व दोन एक्कर १५ गुंठे क्षेत्रात ८०० क्विंटल टरबुजायचे भरघोस उत्पादन घेतले.

टरबुजाला एक हजार १५० रुपये प्रति क्विंटलच्या दराने विकूण नऊ लाख रुपयाचे विक्रमी उत्पादन घेतले. एकीकडे सततची नापिकीला कंटाळून तालुक्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येने द्विशतक गाठले असतानाच नितीनने घेतलेले ही पीक इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देणारे ठरत आहे.

Web Title: Akola Nine Lakh Income Watermelon Farming Modern Technology Eight Hundred Quintals Production Two Acres

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..