Nagpur News : नागपूर मेडिकल व मेयो हॉस्पिटलच्या तपासणीत सिकलसेल व थॅलेसेमिया रुग्णांची वाढती संख्या उघड झाली आहे. १.३४ लाख लोकांच्या तपासणीत ही धोकादायक परिस्थिती स्पष्ट झाली असून, यावर तातडीने जनजागृती गरजेची आहे.
नागपूर : देशामध्ये केंद्र शासनाकडून सिकलसेल निर्मूलन अभियान हाती घेण्यात आले आहे. त्याचवेळी मेयो, मेडिकलने केलेल्या तपासणीत सिकलसेल आणि थॅलेसेमियाची पुढे आलेली आकडेवारी चिंता वाढवणारी ठरली आहे.